एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला; ४७ प्रश्नांवरील आक्षेपांचे निराकरण
By रेश्मा शिवडेकर | Published: May 30, 2024 08:29 PM2024-05-30T20:29:43+5:302024-05-30T20:30:08+5:30
एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीतील एकूण ५,१०० प्रश्नांपैकी ४७ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले आहे. एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
२२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ३० सत्रात ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांबाबत १४२५ आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यापैकी ४७ आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिली.