MHTCET परीक्षांच्या तारखा जाहीर, अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 09:25 PM2020-05-19T21:25:22+5:302020-05-19T21:25:35+5:30

जुलै महिन्याच्या ४, ६ , ७, ८, ९, १०, १३, १४ , २८ , २९,३०, ३१ या तारखाना एमएचटी सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत,

MHTCET exam dates announced, once again extended to fill the application MMG | MHTCET परीक्षांच्या तारखा जाहीर, अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ 

MHTCET परीक्षांच्या तारखा जाहीर, अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ 

Next

मुंबई - बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी घेतली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा होणे आवश्यक आहे त्यामुळे ती जुलै महिन्यात घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. त्यानंतर सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सोबतच प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती ही संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

जुलै महिन्याच्या ४, ६ , ७, ८, ९, १०, १३, १४ , २८ , २९,३०, ३१ या तारखाना एमएचटी सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ ऑगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे. सीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा या वेगवेगळ्या होणार आहेत. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील सीईटी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्ब्ल ५ लाख २४ हजार ९०७ अर्ज आले होते. त्यानंतर आता पुन्हा अर्ज भरण्याची लिंक ओपन केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याची माहिती सीईटीचे सुभाष महाजन यांनी दिली. 

या अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी मुदतवाढ 

अभ्यासक्रम - अर्जसंख्या - अर्ज भरण्याची मुदत सीईटी परीक्षेची प्रस्तावित तारीख 
बीएड - ३६५७३- ३० मे - १५/ १६ जुलै - ४ सेशन्स 
एलएलबी ३ वर्ष - २८,६१५- ३० मे - ६ ऑगस्ट - २ सेशन्स 
एमएड - १४९६- ३० मे - २४ जुलै 
बीएबीएड /बीएससीबीएड(इंटिग्रेटेड) - १९३३- ३० मे - २४ जुलै 
बीएड /एमएड (इंटिग्रेटेड )- १४७६- ३० मे - १९ जुलै 
एमपीएड - १६३७- ३० मे - २४ जुलै 
बीपीएड - ५९७० - ३० मे - २४ जुलै 
एलएलबी ५ वर्षे (इंटिग्रेटेड )- २२३९८ - मुदतवाढ नाही - २४ जुलै - २ सेशन्स 
 

Web Title: MHTCET exam dates announced, once again extended to fill the application MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.