एमआय ज्युनियर क्रिकेट स्पर्धा; व्हीपीएमएस विद्यामंमदिर, पराग इंग्लिश स्कूलचे चमकदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:24 PM2022-12-28T18:24:38+5:302022-12-28T18:25:23+5:30
एमआय ज्युनियर क्रिकेट स्पर्धेत व्हीपीएमएस विद्यामंमदिर आणि पराग इंग्लिश स्कूलने विजय मिळवला.
मुंबई : डावखुरा फिरकीपटू जश नायक याच्या (एका धावेमध्ये 5 विकेट) अचूक मार्याच्या जोरावर मुंबई इंडियन्स (एमआय) ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात व्हीपीएमएस विद्यामंमदिर, दहिसर संघाने रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ संघावर एकतर्फी लढतीत 10 विकेट राखून मात केली. 16 वर्षांखालील मुले गटात हिृमन राखुंडे याने (121 चेंडूंत 146 धावा) शानदार शतक झळकावताना पराग इंग्लिश स्कूल (भांडुप) संघाला 272 धावांनी आरामात विजय मिळवून दिला.
ओव्हल मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात जश नायक याने निम्मा संघ गारद केल्याने रायन इंटरनॅशनल स्कूलचा डाव अवघ्या 17 धावांमध्ये आटोपला. 18 धावांचे तुटपुंजे आव्हान व्हीपीएमएस विद्यामंमदिर संघाने 2 षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. 14 वर्षांखालील गटातील अन्य सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली) संघाने स्वप्नील वर्मा याच्या (76 चेंडूंत 100 धावा) यांच्या शतकी खेळीच्या बळावर 482 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचे 502 धावांचे मोठे लक्ष्य प्रतिस्पर्धी आर.जे. ठाकोर हायस्कूल (ठाणे) संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव 20 धावांवर आटोपला. स्वामी विवेकानंद स्कूलकडून आर्यांश सिंगने (10 धावांत 6 विकेट) सर्वात प्रभावी गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक -
14 वर्षांखालील मुले गट -
- स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)-34 षटकांत 502/9(स्वप्नील वर्मा 100, प्रसून सिंग 59, वेदांत पाटील 45; प्रतुल मोरे 4-45, मोहित लोहार 3-51) विजयी वि. आर जे ठाकूर स्कूल (ठाणे)-7.4 षटकांत 20/9(आर्यांश सिंग 6-10). सामनावीर: स्वप्नील वर्मा.
- एसआयडब्लूएस हायस्कूल (वडाळा)-10.4 षटकांत सर्वबाद 28(इशान गोळे 3-6, ओम सालेकर 3-6) पराभूत वि. एसईएस हायस्कूल (ठाणे)-3.3 षटकांत 30/0(पार्थ राणे नाबाद 12). सामनावीर: ओम सालेकर.
- एन.एल. दालमिया हायस्कूल (मीरा रोड)-37 षटकांत सर्वबाद 181(स्वराज गाढवे 56, वंशम व्होरा 40; राजवीर लाड 4-22) पराभूत वि. स्वामी विवेकानंद हायस्कूल (चेंबूर)-21.4 षटकांत 185/3(यश केरकर 89, पार्थ शिरोडकर नाबाद 30). सामनावीर: राजवीर लाड.
- एन जी वर्तक इंग्लिश स्कूल (विरार)-27.4 षटकांत सर्वबाद 94(श्रेयश मोरे 27; अद्वैत भट 3-12) पराभूत वि. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल (कांदिवली)-12.5 षटकांत 95/1(नील कोळी 41) . सामनावीर: नील कोळी.
- रायन इंटरनॅशनल स्कूल (नेरुळ)-10.3 षटकांत सर्वबाद 17(जश नायक 5-1) विजयी वि. व्हीपीएमएस विद्यामंदिर (दहिसर)-2 षटकांत 18/0 . सामनावीर: जश नायक.
16 वर्षांखालील मुले गट -
- लक्षधाम हायस्कूल (गोरेगाव)-40 षटकांत 283/7(सौरिश देशपांडे 96, आर्यन पवार 76, तनिश शेट्टी 50; दीक्षांत पाटील 3-57) विजयी वि. के.सी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण)-28.5 षटकांत सर्वबाद 128(हर्ष पाटील33; तनिश शेट्टी 3-16, इशान सेठी 3-36, सौरिश देशपांडे 2-17). सामनावीर: सौरिश देशपांडे.
- जमनाबाई नरसी स्कूल (विलेपार्ले)-26.2 षटकांत 197/8(जय टोलिया 96, आरव कानबार 35; ध्येय छाडवा 3-13) पराभूत वि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (विक्रोळी)- 23 षटकांत 3 बाद 201(प्रतीक नाईक 74, ध्येय छाडवा 51, अथर्व जोशी नाबाद 47). सामनावीर: ध्येय छाडवा.
- सेंट झेवियर्स हायस्कूल (विरार)-22.2 षटकांत सर्वबाद 102(काव्या शहा 31; आदित्य कौलगी 4-20) पराभूत वि. श्री मा विद्यालय (ठाणे) 16.5 षटकांत 104/1 (अभिनंदन चव्हाण नाबाद 38, कामेश जाधव नाबाद 33). सामनावीर: आदित्य कौलगी.
- सेंट पॉल हायस्कूल (दादर)-33 षटकांत सर्वबाद 162(आयुष रोग्ये 36, हर्ष येवले 34; तेजस जोशी 3-26) विजयी वि. साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल (दादर)-26 षटकांत सर्वबाद 104(पीयूष पवार 27; आयुष रोग्ये 3-29). सामनावीर: आयुष रोग्ये.
- पराग इंग्लिश स्कूल (भांडुप)-40 षटकांत 339/4 (हिृमन राखुंडे 146, अभिनव शर्मा 84) विजयी वि. द स्कॉलर्स इंग्लिश हायस्कूल (भिवंडी)-20.3 षटकांत सर्वबाद 67 (आर्यन केदार 20; जय भानुशाली 3-16). सामनावीर: हिृमन राखुंडे.
- पवार पब्लिक स्कूल (भांडुप)-33.3 षटकांत सर्वबाद 122 (आर्यन मरगजे 29; सय्यद मोहम्मद 4-23, संदीप सरोज 3-37) पराभूत आयईएस हायस्कूल (नवी मुंबई)-25.4 षटकांत 124/7 (साहिल सिंग 26, साहिल पाटील नाबाद 22; रुद्र कामत 2-22, आर्यन मरगजे 2-36). सामनावीर: सय्यद मोहम्मद.
15 वर्षांखालील मुली गट -
- सेंट कोलंबा स्कूल विजयी वि. रायन इंटरनॅशनल स्कूल (खारघर)- पुढे चाल.
- सेंट अॅन्स कॉन्व्हेंट स्कूल (वसई)-15 षटकांत 143/2(प्रतीक्षा सातपुते 55; इशिता शेट्टी 2-25) पराभूत वि. पवार पब्लिक स्कूल (भांडुप)-7.5 षटकांत 1 बाद 144 (इशिता शेट्टी 28, प्रचिती सावंत नाबाद 24). सामनावीर: इशिता शेट्टी.