साकीनाका येथील गणेशोत्सव मंडळाचा मायक्रो गणेशा, ९ मिलिमीटर उंचीची गणेशमूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:34 AM2020-08-26T01:34:58+5:302020-08-26T01:35:20+5:30

ही गणेशमूर्ती पेन्सिलच्या टोकावर कोरीव काम करून साकारली असून तिला पाहण्यासाठी सूक्ष्म दुर्बिणीचा वापर करावा लागतो.

Micro Ganesha, 9 mm high Ganesha idol of Ganeshotsav Mandal at Sakinaka | साकीनाका येथील गणेशोत्सव मंडळाचा मायक्रो गणेशा, ९ मिलिमीटर उंचीची गणेशमूर्ती

साकीनाका येथील गणेशोत्सव मंडळाचा मायक्रो गणेशा, ९ मिलिमीटर उंचीची गणेशमूर्ती

Next

मुंबई : साकीनाक्याच्या परेरावाडी येथील ओम श्रीसिद्धिविनायक मित्र मंडळाने एक अनोखी गणेशमूर्ती साकारली आहे. या मंडळाने मायक्रो गणेशा ही संकल्पना समोर ठेवून ९ मिलिमीटर उंचीची डोळ्यांनी सहजपणे न दिसणारी गणेशमूर्ती साकारली आहे.

ही गणेशमूर्ती पेन्सिलच्या टोकावर कोरीव काम करून साकारली असून तिला पाहण्यासाठी सूक्ष्म दुर्बिणीचा वापर करावा लागतो. ही गणेशमूर्ती मुंबईतील सर्वात लहान उंचीची उभी मूर्ती असल्याचा मंडळाचा दावा आहे. या मंडळाची स्थापना १९९३ मध्ये झाली असून, हे मंडळ दरवर्षी लक्षवेधी उपक्रम राबवत असते. मुंबईचा महाराजाधिराज अशी ख्याती असलेल्या या मंडळाची गणेशमूर्ती दरवर्षी इकोफ्रेंडली असते. मागील वर्षी या मंडळाने २५ फुटी उभी कागदी गणेशमूर्ती साकारली होती. यंदा तशीच उभी गणेशमूर्ती ९ मिलिमीटर एवढ्या छोट्या उंचीची साकारल्याने ही गणेशमूर्ती लक्षवेधी ठरत आहे. येथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून व्हिटामिन सीच्या गोळ्या देण्यात येत आहेत.

मंडळाने यावर्षी आपल्या विभागात आरोग्यविषयक उपक्रम राबविले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश खानविलकर व उपाध्यक्ष स्वप्नील धुरी यांनी दिली.

ही गणेशमूर्ती पेन्सिलच्या टोकावर कोरीव काम करून साकारली असून तिला पाहण्यासाठी सूक्ष्म दुर्बिणीचा वापर करावा लागतो. ही गणेशमूर्ती मुंबईतील सर्वात लहान उंचीची उभी मूर्ती असल्याचा मंडळाचा दावा आहे. उभी गणेशमूर्ती ९ मिलिमीटर एवढ्या छोट्या उंचीची साकारल्याने लक्षवेधी ठरत आहे. येथे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांना प्रसाद म्हणून व्हिटामिन सीच्या गोळ्या देण्यात येत आहेत.

बाल कर्करुग्णांचा ‘चॉकलेट बाप्पा’
प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. पण परळ येथील वाडिया रुग्णालयातील बाल कर्करुग्णांनी एका अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले आहे. या लहान मुलांनी स्वत:च्या हातांनी चक्क चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेशही यावेळी या मुलांनी दिला आहे.

वाडिया रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या की, यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा रुग्णालयात गणेशाची स्थापना केली आहे. सध्या रुग्णालयात अनेक बाल कर्करुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूरदूरहून रुग्ण उपचारांसाठी येत असल्याने ते या ठिकाणीच राहतात. या लहान मुलांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. पण आजाराने कोलमडून न जाता त्यांना धैर्याने तोंड देण्यासाठी खास या मुलांसाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या बाप्पासाठी सुरेख असा देखावाही साकारण्यात आला आहे. यात मुलांनी पर्यावरणासंबंधी अनेक चित्रे काढली आहेत. गणपतीसाठी मोदकाचा नैवद्यही ठेवण्यात आला आहे. हा सण साजरा करताना अनेक मुलांच्या चेहºयावर आनंद पाहायला मिळत होता. तसेच आम्ही या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, अशा संस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, असेही डॉ. बोधनवाला म्हणाल्या.

इकोफ्रेंडली बाप्पा, कुंडी, तुळशी रोपाचे वाटप

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गणेशभक्तांवर आर्थिक संकट आले आहे. या दृष्टिकोनातून मंडळांसह गणेशभक्तांना कर्तव्य म्हणून एक हात मदतीचा पुढे करण्यात आला आहे. या माध्यमातून इकोफ्रेंडली मूर्तीसोबत कुंडी, तुळशीचे रोप दिले जात आहे.

जोगेश्वरीमधील विकलांग मुलांना प्रोत्साहन दिले जात असून, या उपक्रमासाठी मंडळांनी सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला आहे. शामनगरचा राजा सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी पूर्व, मरोळचा मोरया अंधेरी पूर्व, विलेपार्लेचा राजा विलेपार्ले पूर्व, मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी पूर्व, खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वांद्रे पूर्व, गुंदवलीचा मोरया अंधेरी पूर्व, पिंपळेश्वर मंडळ बांद्रेकर वाडी जोगेश्वरी पूर्व, बांद्रेकर वाडी मित्रमंडळ जोगेश्वरी पूर्व, अभिषेक प्रकाश मडव विलेपार्ले पूर्व या मंडळांचा यात समावेश आहे.

यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, शामनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मेघवाडी जोगेश्वरी पोलीस ठाणे तसेच संपूर्ण पोलीस यंत्रणा, सागर मंडप डेकोरेटर यांनी मदत केली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती कोविड दल सदस्य कल्पेश राणे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाची पार्श्वभूमी आणि पर्यावरणाचा विचार करून दादर येथील अमरशक्ती क्रीडा मंडळाने बांधलेल्या कृत्रिम तलावात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करत विभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी विसर्जन करणाºया कुटुंबांना भेटवस्तूही देण्यात आल्या. हा तलाव गणेशोत्सवाच्या अकराही दिवस विसर्जनासाठी उपलब्ध असणार आहे. 

Web Title: Micro Ganesha, 9 mm high Ganesha idol of Ganeshotsav Mandal at Sakinaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.