मध्यरेल्वेचा आज विशेष ब्लॉक, शेवटची कर्जत लोकल रात्री ११.३0 वाजता

By Admin | Published: May 28, 2016 03:32 AM2016-05-28T03:32:27+5:302016-05-28T08:17:14+5:30

कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलाच्या कामासाठी २८ मेच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजल्यापासून सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mid-low today, special block, last lending local at 11.30 pm | मध्यरेल्वेचा आज विशेष ब्लॉक, शेवटची कर्जत लोकल रात्री ११.३0 वाजता

मध्यरेल्वेचा आज विशेष ब्लॉक, शेवटची कर्जत लोकल रात्री ११.३0 वाजता

googlenewsNext

मुंबई : कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलाच्या कामासाठी २८ मेच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजल्यापासून सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून, हे काम २९ मेच्या पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत चालेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
या कामामुळे २८ मे रोजी सीएसटीहून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री साडे अकरा वाजता सोडण्यात येईल, तर रात्री साडे अकरानंतर सीएसटी मेन लाइनवरून सुटणाऱ्या सर्व लोकल या कुर्ला स्थानकातून सोडण्यात येतील. याच दिवशी हार्बर सीएसटीहून वाशीसाठी शेवटची लोकल रात्री ११.३८ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसटीहून सुटणाऱ्या हार्बरच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान मेन लाइनवरील २४ लोकल फेऱ्या तर हार्बरवरील २८ फेऱ्या आणि काही मेल-एक्स्प्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्लॉककाळात पुढीलप्रमाणे लोकल धावतील


मेन लाइन
- २८ मे रोजी सीएसटीहून रात्री साडे अकरानंतर सुटणाऱ्या लोकल या कुर्ला स्थानकातून सुटतील.
- शेवटची कर्जत-सीएसटी लोकल कुर्ला स्थानकात २३.५६ वाजता पोहोचेल.
- ब्लॉक संपताच २९ मेच्या पहाटे ५ वाजता सीएसटी-कसारा पहिली लोकल सोडण्यात येईल.

हार्बर लाइन
- ब्लॉकच्या काळात वाशी ते वडाळादरम्यान लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील.
- २८ मे रोजी शेवटची पनवेल-सीएसटी अप लोकल पनवेल येथून २३.३४ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर २९ मे रोजी पहिली सीएसटी-पनवेल डाऊन लोकल सीएसटीहून पहाटे ५.२२ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली पनवेल-सीएसटी लोकल पनवेलहून पहाटे ४.२६ वाजता सुटेल.

पश्चिम रेल्वेचा शनिवारी जम्बो ब्लॉक
ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा व अन्य तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते भार्इंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्री १२.५0 ते रविवारी पहाटे ४.५0पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉकचे काम सुरू राहील. ब्लॉकदरम्यान विरार, वसई रोडहून बोरीवलीच्या दिशेने येणाऱ्या अप लोकल आणि गोरेगावहून वसई रोड-विरारच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील.
त्याचप्रमाणे २९ मे रोजी मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही ट्रेन अंशत: रद्द करण्यात आल्या असून, त्यांच्या शेवटच्या थांब्यात बदल करण्यात आला आहे. ट्रेन नंबर 0१0६६ एर्नाकुलम-मुंबई एसी विशेष ट्रेन ठाणे स्थानकापर्यंत चालविली जाईल. तर ट्रेन नंबर ११0२0 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन नंबर १२१३४ मेंगलोर-मुंबई एक्स्प्रेस, ट्रेन नंबर ५१0३४ साईनगर शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर, ट्रेन नंबर १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस आणि ट्रेन नंबर १२१0६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.


- ट्रेन नंबर ११0१0 पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
- ट्रेन नंबर ११00९ मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
- ट्रेन नंबर २२१0२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
- ट्रेन नंबर २२१0१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

२९ मे रोजी सीएसटीहून सुटणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
- ट्रेन नंबर १0१0३ सीएसटी-मांडवी एक्स्प्रेस सीएसटीहून सकाळी ७.१0ऐवजी ९.0५ वाजता सुटेल.
- ट्रेन नंबर ११३0१ सीएसटी-बंगळुरू उदयन एक्स्प्रेस सीएसटीहून सकाळी 0८.0५च्या ऐवजी १0.00 वाजता सुटेल.
- ट्रेन नंबर 0१0६३ सीएसटी-चेन्नई हॉलिडे विशेष ट्रेन सीएसटीहून १३.१0ऐवजी १६.४0 वाजता सुटेल.

Web Title: Mid-low today, special block, last lending local at 11.30 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.