Join us

पालिकेतही युतीला हादरे?

By admin | Published: November 11, 2014 2:02 AM

राज्यातील सत्ता स्थापनेदरम्यान भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद अद्याप कायम असल्याने याचा फटका मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपा युतीला बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सचिन लुंगसे- मुंबई
राज्यातील सत्ता स्थापनेदरम्यान भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद अद्याप कायम असल्याने याचा फटका मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपा युतीला बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते महापालिकेतील शिवसेना-भाजपा प्रणीत युती तुटण्याची शक्यता नसली तरी वारंवर उडणा:या खटक्यांमुळे महापालिकेत भाजपा आता कधीही अविश्वासाचा ठराव आणू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर तरी भाजपा आणि शिवसेनेमधील तणाव निवळेल आणि शिवसेना भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवेल, अशी शक्यता होती. मात्र भाजपाने सत्तेची चावी आपल्याच हाती ठेवत शिवसेनेचे मनसुबे उधळून लावले. परिणामी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शविल्याने आता पालिकेतील सत्तेची समीकरणो बदलतील, असा राजकीय अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 17 वर्षे राज्य करणा:या शिवसेना-भाजपा युतीने धुसफुशीनंतरही 2क्12च्या पालिका निवडणुकीत आपली मैत्री कायम ठेवली. मात्र त्यांचे अंतर्गत वाद उफाळतच राहिले. विधानसभा निवडणुकीदरम्यान याचा प्रत्यय आला असून, महापालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक आहेत. तर भाजपाचे 31 नगरसेवक असून, मनसेचे 27 नगरसेवक आहेत. भाजपाने युतीतून बाहेर पडायचे झाल्यास त्यांना अविश्वासाचा ठराव आणावा लागेल.
यासंदर्भातील अधिकार हे महापौरांकडे असून, सद्य:स्थितीमध्ये महापौर या शिवसेनेच्या आहेत. तरीही भाजपाने ब्लेम-गेम करून पालिकेतील शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला तर सेनेची मनसेशी भाऊबंदकी 
होण्याची शक्यता नाकारता येत 
नाही. (प्रतिनिधी)
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना काहीच आदेश दिलेले नाहीत; आणि भाजपाकडूनही युती तुटण्याबाबतचे संकेत मिळालेले नाहीत. तरीही विधानसभेतील राजकीय समीकरणो पाहता युती तुटली तर 
अपक्ष नगरसेवकांसह मनसे सेनेला सहज सत्ता स्थापनेसाठीच्या संख्याबळार्पयत पोहोचवेल, अशी सत्ता स्थापनेची राजकीय समीकरणो बांधली जात आहेत. 
 
महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी 114 संख्याबळ आवश्यक असून, नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत 15 अपक्ष नगरसेवकांनी मते युतीच्या पारडय़ात टाकली होती. मनसेने सेनेला पाठिंबा दर्शविल्यास शिवसेनेला सहज संख्याबळ गाठता येईल.  
 
पक्षीय बलाबल 
शिवसेना75
भाजपा31
काँग्रेस52
मनसे27
राष्ट्रवादी13
अपक्ष13
अपक्ष गट2
सपा9
अभासे2
भारिप1
रिपाइं1
रिक्त1