मध्य-पश्चिम रेल्वेचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:36 AM2017-08-30T05:36:42+5:302017-08-30T05:37:53+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

The middle-western railway fired up | मध्य-पश्चिम रेल्वेचा उडाला बोजवारा

मध्य-पश्चिम रेल्वेचा उडाला बोजवारा

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. सकाळी नागपूरहून मुंबईकडे येणाºया दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आगामी ४८ तासांत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे उपाय घेण्याची गरज आहे. आॅफिसला जाण्यासाठी आज सकाळी मुंबईकर नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले, मात्र संध्याकाळच्या वेळेला घरी जाण्यासाठी प्रचंड हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उद्या सकाळी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असू शकते.
मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आज जी परिस्थिती झाली, तिच पुन्हा होऊ शकते. लोकल वाहतूक कोलमडल्यानंतर आॅफिसहून घरी जाण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे गरज असेल, तर आॅफिसला जावे.

भाजीपाला व दुधाचा तुटवडा मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नवी मुंबई तसेच राज्यातील इतर ठिकाणांहून येणारा भाजीपाला व दूध बुधवारी शहरात दाखल होण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे मुंबईकरांना भाजीपाला व दुधाचा तुटवडा भासू शकतो. यासाठी प्रशासनानेही कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

पाणी तुंबलेली ठिकाणे : पावसामुळे शहर व उपनगरातील तब्बल ३० वर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोºया उडाला. काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी कमरे इतके पाणी साचल्याने अनेक वाहने त्यात अडकून पडल्याचे चित्र निर्माण झाले. पावसाचा जोर ओसरला तरी रात्री उशीरापर्यंत याठिकाणी पाणी साचून राहिले होते. राणीबाग जंक्शन (भायखळा), नायकवाड जंक्शन, कालापाणी (आग्रीपाडा), बच्चूभाई घड्याळ चौक (ताडदेव), आॅर्थर रोड नाका (चिंचपोकळी)
 

Web Title: The middle-western railway fired up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.