पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:52 IST2020-05-28T09:28:57+5:302020-05-28T10:52:48+5:30
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता 177 स्थलांतरित मजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच्या एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते.

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात मजूर आपल्या घरी परतण्यासाठी पायी चालताना, ट्रकवरून लटकलेले किंवा बस-ट्रेनने घरी जाताना पाहिले असेल. मात्र, आता मजूर पहिल्यांदाच विमानने घरी परतत आहेत. मुंबईतील मजुरांना घेऊन विमान रांचीला रवाना झाले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 177 मुजरांना विमानतळापर्यंत पोहोचविण्यात आले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता 177 स्थलांतरित मजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच्या एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते. बंगळुरू लॉ स्कूल एलुमनाई असोसिएशनच्या प्रियंका रमन प्रत्येक मजूर विमानळावर पोहोचला की नाही याची खात्री करत होत्या.
या लॉ स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी काही स्वयंसेवी संस्थांसह मुंबईतील विविध भागातील स्थलांतरित मजुरांना एकत्र केले. तसेच, त्यांना विमान प्रवासाचे तिकिट देण्याचीही व्यवस्था केली. प्रियांका रमन यांचे म्हणणे आहे की, रांचीहून बरेच प्रवासी आहेत हे आम्हाला माहीत होते, ज्यांना परत जायचे होते. यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
ज्याठिकाणी परिवहन संपर्क खराब आहे, अशा राज्यातल्या मजुरांना परत पाठविण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही ठरविले की, झारखंडमधील लोकांना परत पाठवू. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी निधीचे आयोजन केले होते, ज्यात सर्व स्थलांतरित मजुरांसाठी तिकिटे, विमानतळ फी आणि परिवहन शुल्क समाविष्ट होते, असेही प्रियांका रमन यांनी सांगितले.
मोठ्या संख्येने मजूर आज विमानाने झारखंडला परतले आहेत. या मुजरांचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. घरी परत जाणारी मंजु देवी म्हणाल्या की, "आम्ही परत जात आहोत कारण पुन्हा काम सुरू होईल याची शाश्वती नाही. आम्ही आता परत येणार नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला येथे बर्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे."
दरम्यान, झारखंडमधील मजूर विमानातून आपल्या राज्यात परत येत आहेत ही खरोखरच आनंदाची बाब आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. अंदमानात अडकलेल्यांना आणण्यासाठी लवकरच आणखी दोन विमाने रांची येथे उतरतील, असे सांगत हेमंत सोरेन म्हणाले राज्य सरकार विमानाचे भाडे देत आहे.
आणखी बातम्या...
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज
Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर
हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा
धक्कादायक! पॅरोलवर सुटल्यानंतर काही तासांत आरोपीचा खून