पोलिसांच्या छावणीत मिहिर कोटेचा यांची गोवंडीत प्रचार यात्रा, विरोधकांना प्रत्युत्तर

By मनीषा म्हात्रे | Published: May 1, 2024 07:35 PM2024-05-01T19:35:54+5:302024-05-01T19:36:18+5:30

तुम्ही हल्ले करा, महायुती तितक्याच ताकदीने, जोशाने प्रचार करेल - मिहीर कोटेचा 

Mihir Kotecha's campaign trip to Govandi in police camp, reply to opponents | पोलिसांच्या छावणीत मिहिर कोटेचा यांची गोवंडीत प्रचार यात्रा, विरोधकांना प्रत्युत्तर

पोलिसांच्या छावणीत मिहिर कोटेचा यांची गोवंडीत प्रचार यात्रा, विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई - दगडफेकच्या घटनेनंतर महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात गोवंडीत प्रचार यात्रा बुधवारी पार पडली. "अशा भेकड हल्ल्याना महायुतीचे कार्यकर्ते भिक घालत नाहीत. पराभव दिसू लागल्यानेच संजय पाटील, असे केविलवाणे प्रयत्न करत  आहेत. महायुतीचे कार्यकर्ते ना थांबणार, ना घाबरणार, ते तितक्याच ताकदीने आणि जोशात प्रचार करणार,  असा विश्वास मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला.

मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर सोमवारी संध्याकाळी गोवंडीच्या न्यू गौतम नगर, सोनापूर भागात दगडफेक झाली. त्यात भाजप सचिव निहारीका खोंदले यांच्यासह दोघे जखमी झाले. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मिहीर कोटेचा यांनी प्रतिस्पर्धी संजय पाटील यांना बुधवारी गोवंडीच्या त्याच भागात प्रचार करेन, हिंमत असेल तर छातीवर वार कर, पाठीवर नको, असे खुले आव्हान दिले होते. 

दिल्या शब्दाप्रमणे मिहीर कोटेचा दुपारी बाराच्या सुमारास गोवंडीच्या शंकरा कॉलनी येथे पोहोचले. ते तेथे येण्याआधीच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे हजारो कार्यकर्ते त्यांना पाठींबा देण्यासाठी जमले होते. मिहीर कोटेचा यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर सुरू झाला. 
 
त्या वक्तव्याविरुद्ध तक्रार
कोटेचा यांच्या वक्तव्याविरुद्ध आपची आयोगाकडे तक्रार मिहिर कोटेचा यांनी संजय पाटील यांच्यावर आरोप करताना मानखुर्द शिवाजी नगरला मिनी पाकिस्तान बनवू पाहत असल्याच्या वक्तव्याविरुद्ध आपच्या पदाधिकाऱ्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Mihir Kotecha's campaign trip to Govandi in police camp, reply to opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.