Join us

‘त्या’ मायलेकाचा मृतदेह नातेवाईकांकडे साेपवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली हाेती आत्महत्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रेश्मा ...

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली हाेती आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रेश्मा त्रेंचिल (४४) या महिलेने तिचा मुलगा गरूड (१०) याच्यासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या दोघांचे मृतदेह शुक्रवारी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले.

त्रेंचिल यांचे अमेरिकेत राहणारे बंधू बॉबी शुक्रवारी भारतात परतले. त्यांचे मुंबईत कोणीही राहत नसल्याने आत्महत्येबाबत साकीनाका पोलिसांनी बॉबी यांना कळवले होते. त्यानंतर मायलेकाचा मृतदेह शवागारात ठेवला होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी सांगितले की, शुक्रवारी मृत महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह आम्ही नातेवाईकांकडे सुपूर्द केला. त्रेंचिल यांना मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला शादाब अयुब खान (३३) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या आई-वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अटक केली नव्हती.

दरम्यान, दाेघांवरही मुंबईतच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. चांदिवलीच्या नाहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला. त्रेंचिल यांचे पती शरद मुलूकुटला यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातच आरोपी शादाब व त्याच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नाेटमध्ये शेजाऱ्यांकडून हाेणाऱ्या त्रासाचा उल्लेख आहे.

..........................................