मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:27 AM2024-10-26T07:27:24+5:302024-10-26T07:27:59+5:30

वरळीत लोकसभेला मविआला कमी मतांची आघाडी मिळाल्याने विधानसभेत महायुतीला विजयाची आशा

Milind Deora may contest Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 in Worli against Aditya Thackeray | मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात

मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळीमधून शिंदेसेनेचे राज्यसभेचे खा. मिलिंद देवरा यांना उतरविणार असल्याची शक्यता आहे. याआधी भाजपच्या शायना एन. सी. यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळे महायुतीचा नेमका कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत आदित्य यांनी राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचा ७० हजारांनी पराभव केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत खा. सावंत यांना येथून कमी मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे महायुतीला येथून विजयाची आशा आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी मांडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे, तर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जनसंवाद यात्रा काढून येथे शिंदेसेनेचा दावा सांगितला होता.

Web Title: Milind Deora may contest Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 in Worli against Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.