गुन्हे शाखेचे मिलिंद काठे सीआययूचे प्रभारी, गुन्हे शाखेला मिळाले नवीन २४ अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:48 PM2021-03-30T23:48:08+5:302021-03-30T23:51:15+5:30

Mumbai Police News : नवीन पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. यात एकाचवेळी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. 

Milind Kathe of Crime Branch in charge of CIU, Crime Branch gets 24 new officers | गुन्हे शाखेचे मिलिंद काठे सीआययूचे प्रभारी, गुन्हे शाखेला मिळाले नवीन २४ अधिकारी

गुन्हे शाखेचे मिलिंद काठे सीआययूचे प्रभारी, गुन्हे शाखेला मिळाले नवीन २४ अधिकारी

Next

मुंबई  -  उद्योगपती मुकेश अंबानी धमकीप्रकरणात बदली  होत निलंबित झालेल्या सचिन वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे वरिष्ठ मिलिंद मधुकर काठे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी धमकी प्रकरणात त्यांच्याकडेही एनआयएने चौकशी केली होती. अशात, गुन्हे शाखेतील ६५ जणांच्या बदलीनंतर मंगळवाऱी गुन्हे शाखेला २४ नवीन अधिकारी मिळाले आहेत. (Milind Kathe of Crime Branch in charge of CIU, Crime Branch gets 24 new officers)
 
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ कारप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययु) तत्कालीन प्रमुख निलंबित सपोनि सचीन वाझे यांना अटक केली आहे. अशात मनसुख हिरन हत्या प्रकरणातही तेच प्रमुख आरोपी असल्याचा संशय एनआयएला आहे. 
 
नवीन पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. यात एकाचवेळी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. 

 त्यानंतर गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी याबाबत आदेश काढून गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या २४ पोलीस निरीक्षकांना नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तसेच वाझे यांच्या नंतर रिक्त झालेल्या जागी कोण येणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अशात गुन्हे शाखेच्या कक्ष दोनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर काठे यांच्याकडे सीआययुची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कक्ष तीनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

       काठे यांच्याकड़ेही एनआयएने चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. मुकेश अंबानी धमकी प्रकरणात सुरूवातीला करण्यात आलेल्या तपास पथकामध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे तपास अधिकारी म्हणून त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: Milind Kathe of Crime Branch in charge of CIU, Crime Branch gets 24 new officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.