Join us

...अन् उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवेळी मिलिंद नार्वेकर बसले होते खाली; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 10:32 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या समोरच खाली बसून मुलाखत ऐकत होते.

मुंबईः उद्धव ठाकरेंनी एबीपी माझाच्या माझं व्हिजन या कार्यक्रमात दिलेली मुलाखत फारच चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरेंनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलेली असली तरी ही मुलाखत एका विशेष गोष्टीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून एबीपी माझाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले असतानाच मिलिंद नार्वेकरांनी आपल्या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या समोरच खाली बसून मुलाखत ऐकत होते.मिलिंद नार्वेकर खाली बसून मुलाखत ऐकत असलेला फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. तोच फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. 1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले.एका सामान्य कुटुंबात जन्माला जन्मलेले मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी धडपडत होते. मुलाखत देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पहिल्याच भेटीत वाकचातुर्य पाहून उद्धव ठाकरेही प्रभावित झाले. नार्वेकरांचं एकंदरीत अनुभव आणि कौशल्य पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी सोपवायची याबाबत त्यांना विचारणा केली. मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या उत्तरानं उद्धव ठाकरेही खूश झाले, तेव्हापासूनच ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. साधारण 1994 साली मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. 

टॅग्स :उद्धव ठाकरे