मिलिंद-अंकिताचा लग्नानंतरचा महत्त्वपूर्ण निर्णय, तुम्हीदेखील कराल त्यांचं तोंडभर कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 02:21 PM2018-04-25T14:21:49+5:302018-04-25T14:23:32+5:30

अंकिता-मिलिंदच्या या निर्णयामुळे सर्वत्र होतेय त्यांचे कौतुक

milind soman surprising initiative with wife after marriage tree plantation | मिलिंद-अंकिताचा लग्नानंतरचा महत्त्वपूर्ण निर्णय, तुम्हीदेखील कराल त्यांचं तोंडभर कौतुक

मिलिंद-अंकिताचा लग्नानंतरचा महत्त्वपूर्ण निर्णय, तुम्हीदेखील कराल त्यांचं तोंडभर कौतुक

googlenewsNext

मुंबई - आर्यन मॅन मिलिंद सोमणनं गर्लफ्रेंड अंकिता कोवरसोबत 22 एप्रिलला थाटामाटात विवाहसोहळा थाटला. अलिबागमध्ये जवळचे नातेवाईक व खास मित्र परिवाराच्या उपस्थित या दोघांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. अंकिता-मिलिंदच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. या युनिक कपलनं लग्नाच्या दोन दिवसांनंतर असा अनोखा उपक्रम राबवलाय की ज्याचे सर्व जण कौतुक करत आहेत. मिलिंद सोमणनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मिलिंद पत्नी अंकितासोबत वृक्षारोपण करताना दिसत आहे. ''लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या नावे एक झाड लावणार, आतापर्यंत 11 झाडे लावण्यात आली आहेत'', असे कॅप्शन मिलिंदनं या फोटोसाठी दिले आहे. 

लग्नानंतर अशा पद्धतीनं आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणं अनोखी व कौतुकास्पद बाब आहे. मिलिंद-अंकिता प्रचंड पर्यावरणप्रेमी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात मिलिंदला फिटनेसचंही तुफान वेड आहे. त्यामुळे आरोग्यासाठी आसपासच्या वातावरणातील हवा शुद्ध असावी, याची जाण त्याला चांगलीच आहे. यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. याचाच एक भाग म्हणून मिलिंद-अंकितानं हा अनोखा उपक्रम राबवलाय. 

मिलिंद-अंकिता लग्नानंतरही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. दोघंही इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो रोमॅन्टिक कॅप्शनसहीत शेअर करत आहेत. मिलिंद-अंकिताच्या लग्नापर्यंतची कहाणी अगदी नाट्यमय व मनोरंजक होती, असं म्हणायला हरकत नाही. दोघांच्या लग्नसोहळ्यादरम्यान सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मिलिंद आणि अंकिताच्या वयामध्ये असलेल्या अंतरामुळे दोघांवर प्रचंड टीका करण्यात आली. एवढंच नाही तर दोघांचं ब्रेक अप झाल्याची अफवाही पसरली होती. लाखो रुपयांची लॉटरी लागल्यानं अंकितानं मिलिंदला सोडलं, अशी चर्चा प्रचंड रंगली होती. मात्र, याकडे दोघांनीही पूर्णतः दुर्लक्ष केले व एकमेकांची साथ कायम निभावण्याची शपथ घेतली.   

दरम्यान, दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अंकिताचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. मिलिंदचे वय 52 तर अंकिता 27 वर्षांची आहे. मात्र मिलिंदसोबत झालेल्या भेटीनंतर अंकिताच्या कुटुंबीयांनी आपला निर्णय बदलला आणि 22 एप्रिलला दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.


 

 

Web Title: milind soman surprising initiative with wife after marriage tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.