मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:12 AM2018-07-17T04:12:43+5:302018-07-17T04:13:06+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही.

 Milk is not the result of milk movement; Sufficient milk available | मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

Next

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध असल्याने सुरळीतपणे विक्री सुरू होती. सध्या गरजेहून अधिक दूध उपलब्ध आहे, मात्र हे आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास दूधटंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
मुंबईला होणारा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ, वारणा याबरोबरच बहुतांश दूध उत्पादक कंपन्यांनी शनिवार, रविवारी अतिरिक्त दूध संकलन करून ठेवले आहे. त्याशिवाय गुजरातहून येणारे अमूलचे दूध आज रेल्वेतून पाठविण्यात आले होते. नवी मुंबईतील संकलन केंद्रातून ११ दुधाचे टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईत सोमवारी सकाळी पाठविण्यात आले.
>गरज ७० लाख लीटरची, पुरवठा
एक कोटी १२ लाख लीटर
मुंबईला ६० लाख लीटर हे खासगी उत्पादक कंपनी, ४० लाख लीटर सहकारी दूध उत्पादक आणि १२ लाख लीटर दूध हे व्यावसायिक घाऊ क विक्रेत्यांकडून पुरवठा होत असते, असे जाणकारांकडून सांगण्यात आले. त्यापैकी मुंबई शहर व उपनगराला सरासरी ७० लाख लीटर दुधाची मागणी असते. त्यामुळे जवळपास दुप्पट दुधाचा पुरवठा असल्याने मंगळवारीही विक्रीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.
>दूध फेकणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी
दूध रोखण्याच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी व दुधाच्या टँकर्सना आगी लावणाºया व दूध फेकून देणाºया बेजबाबदार आंदोलक व नेत्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅडव्होेकेट शिरीष देशपांडे यांनी केली आहे.
दुधाची शेतकºयांना द्यायची किंमत व ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत ही शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, अशीही मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.
>काँग्रेसचा पाठिंबा : दूध दरवाढीच्या विषयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी सुरू केलेले आंदोलन योग्य असून, शेतकरी हितासाठीच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी सांगितले. रस्त्यावर दूध ओतण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ दुधाची नासाडी होवू नये, ही भावना मी समजू शकतो़ परंतु शेतकºयांनी करायचे तरी काय, असा सवाल चव्हाण यांनी केला़
>कुठे झाले किती दुधाचे संकलन? (लाख लि.)
जिल्हा रोजचे सोमवारचे दूध पडून नुकसान
कोल्हापूर २१.५ शून्य २१.५ ७.६०
सांगली १४ ०१ १३ ४.६०
सातारा २३.५८ १.८२ २२.८७ ८.०९
सोलापूर ८ ३१ हजार ७.६९ २.७२
अहमदनगर २४ शून्य २४ ८.४८
पुणे ३० २१ ०९ ३.१८

Web Title:  Milk is not the result of milk movement; Sufficient milk available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.