मुंबईकरांनो पुढे या मदत करा! गरजूंची भूक भागविण्यासाठी होणार ‘मिलकर’ प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:26 AM2020-06-30T01:26:13+5:302020-06-30T01:26:30+5:30

मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वंयसेवी संस्था, कॉपोर्रेट हाऊसेसचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले

‘Milker’ efforts to satisfy the hunger of the needy; The Chief Minister appealed | मुंबईकरांनो पुढे या मदत करा! गरजूंची भूक भागविण्यासाठी होणार ‘मिलकर’ प्रयत्न

मुंबईकरांनो पुढे या मदत करा! गरजूंची भूक भागविण्यासाठी होणार ‘मिलकर’ प्रयत्न

Next

मुंबई : मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे, सगळे मिळून काम करतात तेव्हा यश हे मिळेतच, त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण कोविड विषाणु विरुद्धचे हे युद्ध जिंकूच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वंयसेवी संस्था, कॉपोर्रेट हाऊसेसचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. मुंबईकरांनी पुढे येऊन "मिलकर" व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

ठाकरे यांच्या हस्ते क्राऊड फंडिंग प्रणालीच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. मिलकरसाठी गोदरेज अँण्ड बॉयसी, आरपीजी फाऊंडेशन, एटीई चंद्रा फाऊंडेशन हे या निधीत भरीव भर घालणार आहेत. एखाद्याने योगदान दिल्यास, त्याच्यामध्ये पाच पट भर घालून हा निधी संबंधित वॉर्डमधील लोकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध कॉपोर्रेट हाऊसचे प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात आर.पी.जी. फाऊंडेशनच्या राधा गोयंका, अक्षय गुप्ता, केटूचे कुणाल कपूर, अनंत गोयंका यांच्यासह म्पालिकेचे अधिकारी सहभागी झाले.

मिलकर काय आहे?
मिलकर हा ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना गरजू लोकांशी जोडणारा सेतू आहे. हे सगळे लोक, मुंबई महापालिका आणि स्वंयसेवी संस्था, कॉपोर्रेट हाऊसेस यांनी एकत्र येऊन भूक निर्मुलनासाठी सुरु केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे, मिलकर यामध्ये जेवढी रक्कम दान होईल त्यात पाचपट रक्कम कॉपोर्रेट हाउसेस टाकतील. यात अनेक स्वंयसेवी संस्थाही सहभागी आहेत.

Web Title: ‘Milker’ efforts to satisfy the hunger of the needy; The Chief Minister appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.