Join us

गिरणी कामगारांच्या मुलांना मिळणार नोकऱ्या; काळाचौकी येथील वस्त्रोद्योग संग्रहालयात नोकरीची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:17 AM

मुंबई : मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी उद्योगाची स्मृती जपण्यासाठी काळाचौकी येथे बांधण्यात येणा-या पहिल्या वस्त्रोद्योग संग्रहालयासाठी अखेर सात वर्षांनंतर मुहूर्त सापडला आहे. केंद्र सरकारच्या युनायटेड टेक्सटाईल मिल क्रमांक २ व ३च्या भूखंडांवर हे वस्त्रोद्योग संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने शनिवारी मंजुरी दिली. या वस्तुसंग्रहालयात गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगाराची संधी देण्याची सूचनाही मान्य करण्यात आली आहे.१९८२मध्ये झालेल्या संपामुळे गिरण्या मुंबईतून नामशेष झाल्या. एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या या वस्त्रोद्योगाची स्मृती पुसली जाऊ नये यासाठी काळाचौकी येथे मिलच्या जागेवर संग्रहालय उभारण्याचा निर्णय २०११मध्ये घेण्यात आला होता. मात्र मिलच्या जागेत बदल करण्यास पुरातन वस्तू समितीकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच या प्रकल्पासाठी खर्च कोण करणार, असा सवालही होताच.याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर चर्चेसाठी आला असता राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी या वस्तुसंग्रहालयात ज्या नोकºया निर्माण होतील त्यात गिरणी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. ही उपसूचना मान्य करीत एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.- या प्रकल्पावर पालिका तीनशे कोटी रुपये खर्च करणार आहे.- एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या वस्त्रोद्योगाची स्मृती पुसली जाऊ नये यासाठी काळाचौकी येथे मिलच्या जागेवर वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय २०११मध्ये घेण्यात आला होता.- शिवसेनेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करीत अर्थसंकल्पात तरतूदही केली होती.- शिवसेनेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करीत अर्थसंकल्पात तरतूदही केली होती.असे असेल वस्तुसंग्रहालयगिरणीतील कामकाजाची पद्धत, जुने यंत्र व कामगार, कामगारांचे दैनंदिन जीवन, त्यांचे राहणीमान, चाळींची प्रतिकृती, गिरणीच्या परिसरात उदयास आलेली संस्कृती.

टॅग्स :मुंबई