Join us  

गिरणी कामगारांची लॉटरी, १२५ जणांना घराची चावी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 5:49 PM

२०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना २९ ऑगस्ट रोजी सदनिकांच्या चाव्यांचे वाटप गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृह येथे दुपारी ४ वाजता आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, कामगार आयुक्त सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

२०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चावी वाटपाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संबंधित गिरणी कामगार/ वारस यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडा