Join us

गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:31 AM

म्हाडा मंडळाच्या आढावा बैठकीत चर्चा

मुंबई : गिरणी कामगारांना नवी मुंबई , उरण , बेलापूर भागातील नैना गृहप्रकल्पात घरे दे ण्यात यावी ,अशी सुचना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केली आहे. म्हाडाने मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी सर्वसामान्यांसाठी घरे बांधावी. मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावे, असेही विखे यांनी सुचवले. म्हाडाकडे असलेल्या मुंबईतील ५६ वसाहतींमधून अधिकाधिक घरे उभे करणे सुरूच राहील. मात्र आता त्यावरही मयार्दा आल्या आहेत, असेही विखे म्हणाले. विखे पाटील यांनी विविध गृहनिर्माण प्राधिकरण आणि म्हाडाच्या सर्व मंडळांची आढावा बैठक वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयामध्ये घेतली़ त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईमध्ये घर घेणे शक्य नाही. म्हाडाकडून बांधली जाणारी घरे २ ते ३ कोटी रूपयांची आहेत. यामुळेच म्हाडा व इतर गृहनिर्माण संस्थांनी मुंबईच्या बाहेर ५० किमी अंतरावर परवडणारी घरे बांधली पाहिजेत. मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावे. आता परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाने मुंबईबाहेर जावे. तसेच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्रधान्य द्यावेह्ण, अशा सूचना विखे पाटील यांनी यावेळी केल्या.या बैठकीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी दीपेंद्रसिंह खुशवाह, दिनकर जगदाळे, शिवशाही पुनर्वसन कंपनीच्या संचालक डॉ.निधी पांड्ये आदी अधिकारी उपस्थित होते.