मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट!
By admin | Published: January 3, 2015 12:56 AM2015-01-03T00:56:34+5:302015-01-03T00:56:34+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
चेतन ननावरे ल्ल मुंबई
नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनोरंजन कर विभागाने कर रूपात वसूल केलेला हा महसूल आहे.
मुंबई शहरांतर्गत विविध ५२ ठिकाणी खाजगी आयोजकांनी पार्ट्यांचे आयोजन केले होते. त्यातील ७ पार्ट्या या ख्रिसमस रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. तर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टीफर्स्टच्या रात्री ४५ आयोजकांनी पार्ट्यांचे आयोजन केले होते. त्यातून ४२ लाख ९२ हजार ९९० रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. गेल्यावर्षी ३६ खाजगी पार्ट्यांमधून शासनाला ३९ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यामुळे खाजगी
पार्ट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले.
पूर्व व पश्चिम उपगनरांतील एकूण ६० हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बारमालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली होती. त्यातून शासनाला ७ लाख २३ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. वास्तविक उपनगरांतील हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बारची संख्या पाहता हा आकडा फारच कमी आहे. त्यास उत्पादन शुल्काचे अवाजवी शुल्क जबाबदार असल्याची प्रतिक्रिया हॉटेल अॅन्ड रेस्टॉरन्ट वेस्टर्न इंडिया संघटनेने दिली आहे.
प्रभादेवीतील पार्टीवर कारवाई
च्खाजगी पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन कर विभागाने विशेष भरारी पथकांची नेमणूक केली होती. या पथकांनी विनापरवाना पार्टी करणाऱ्या दोन आयोजकांविरोधात कारवाई केली आहे. त्यात प्रभादेवीतील एका मोठ्या पार्टीचा समावेश आहे. बँक्वेट हॉलमध्ये ही पार्टी सुरू असताना पथकाने छापा टाकून विनापरवाना सुरू असलेल्या पार्टीवर कारवाई केली.
़़़तरीही ५० लाखांचा महसूल : अवाजवी उत्पादन शुल्काच्या कारणास्तव मुंबईतील बहुतेक हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बारमालकांनी थर्टीफर्स्ट पार्टीकडे पाठ फिरवली असली, तरी एका रात्रीत प्रशासनाला ५० हजार १५ हजार ९९० रुपयांचा महसूल मिळाला आहे. शिवाय शहरातील बार, रेस्टॉरन्ट आणि हॉटेलमधून मिळालेल्या उत्पादन शुल्काची भर घातल्यास या निधीत आणखीन भर पडेल.
अवाजवी शुल्काने व्यावसायिकांत नाराजी
संघटनेच्या म्हणण्यानुसार एका दिवसाच्या पार्टीसाठी मनोरंजन करापोटी प्रत्येक तिकिटामागे २५ टक्के मनोरंजन कर आकारला जातो. याउलट उत्पादन शुल्क विभागाकडून सरसकट सर्वांकडूनच एका रात्रीसाठी हव्या असलेल्या परवान्यासाठी १२ हजार ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे छोट्या आणि मध्यमवर्गीय हॉटेल चालकांनी थर्टीफर्स्टच्या पार्टीकडे पाठ फिरवली होती. परिणामी केवळ नामांकित आणि उच्चभ्रू लोकांची ये-जा असलेल्या बड्या हॉटेल आणि बारचालकांनी थर्टीफर्स्टच्या रात्री पार्ट्या ठेवल्या होत्या. बाकी सर्व हॉटेल आणि रेस्टॉरन्ट चालकांनी थर्टीफर्स्टच्या पार्टीकडे पाठ फिरवली होती.