Join us

बाळ परत देण्यासाठी लाखोंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:06 AM

बाळ परत देण्यासाठी लाखोंची मागणीमहिला केअर टेकरला मालाडमध्ये अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अविवाहित जोडप्याने पैसे देऊन ...

बाळ परत देण्यासाठी लाखोंची मागणी

महिला केअर टेकरला मालाडमध्ये अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अविवाहित जोडप्याने पैसे देऊन बाळ सांभाळण्याची जबाबदारी दिलेल्या बाळाचेच अपहरण करण्याची धमकी महिला केअर टेकरने दिली. याप्रकरणी मालाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी बाळाची सुखरूप सुटका केली.

अविवाहित असलेल्या एका जोडप्याने लग्न करेपर्यंत त्यांच्या लहान बाळाला सांभाळण्याची जबाबदारी गीता खत्री (३४) नामक महिलेला दिली होती. याच महिलेकडून डिलिव्हरीसाठी रुग्णालयात देण्यासाठी पाच टक्के व्याजाने ७० हजार रुपये बाळाच्या वडिलांनी घेतले होते. त्यानंतर बाळाला सांभाळावे, अशी विनंती त्यांनी खत्रीकडे केली. त्यासाठी पैसे देऊ असे सांगितले. त्यानुसार ती पैसे घेऊन बाळाला सांभाळू लागली. त्यानंतर मात्र ती त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करू लागली. तसेच बाळाबद्दल घरच्यांना सांगेन अशी धमकीही देऊ लागली. अखेर बाळाच्या वडिलांनी घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनी याची कल्पना बाळाच्या आईकडच्या लोकांनाही दिली. त्यांनी बाळाला स्वीकारले.

बाळाला परत आणण्यासाठी त्यांनी खात्रीचे ७० हजार रुपयेही परत दिले. मात्र खत्री बाळाच्या बदल्यात दोन लाख रुपये मागू लागली. तसेच बाळाचे अपहरण करण्याची धमकी देऊ लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर दळवी व त्यांच्या पथकाने खत्रीला अटक करून बाळाला सुखरूप त्याच्या आईवडिलांकडे साेपवले.