लाखो मूर्तींच्या विक्रीत कोट्यवधीची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:13 AM2019-09-04T06:13:40+5:302019-09-04T06:13:54+5:30

कोल्हापूरच्या महापुरामुळे घटली मागणी

Millions of idols turn up in sales of millions of idols | लाखो मूर्तींच्या विक्रीत कोट्यवधीची उलाढाल

लाखो मूर्तींच्या विक्रीत कोट्यवधीची उलाढाल

googlenewsNext

सुदाम देशमुख

मुंबई/अहमदनगर : यंदा महागाई, दुष्काळाचे सावट व आर्थिक मंदीची झळ असतानाही गणेश मूर्तींच्या विक्रीने राज्यातील १२ जिल्ह्यांतच सुमारे १२७ कोटींची उड्डाणे घेतली. राज्यातील गणेशमूर्तींची उलाढाल २00 कोटींच्या वर जाईल. केवळ १२ जिल्ह्यांत गणेशमूर्तींची संख्या २२ लाखांहून अधिक आहे.

गणेशमूर्तींमुळे १२ जिल्ह्यांमध्ये किमान ४0 हजार जणांना तीन महिन्यांसाठी थेट रोजगार मिळाला. अप्रत्यक्ष रोजगार मिळालेल्यांची संख्या ५0 हजारांपर्यंत असू शकेल. पेण, अहमदनगर, नाशिक, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणच्या मूर्तीना अन्य राज्यांतही मागणी होती. यंदा बऱ्याच मूर्तीकारांनी प्लास्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या.मूर्तीसाठीच्या कच्च्या मालावर जीएसटी द्यावा लागतो. रंग व मजुरीचे दर वाढल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी मूर्तींचे दर वाढले. या दरवाढीचा मूर्ती खरेदी-विक्रीवर फार परिणाम नव्हता. कोल्हापूर, सांगलीतील पुरामुळे तेथून होणारी मूर्तींची मागणी घटली़

गणेशोत्सव सर्वधर्मीयांचा आहे. मंडप बांधण्यापासून मूर्ती घडवणे, मूर्तिला आकार देणे अशा विविध कामांमध्ये सर्वधर्मीय सहभागी होतात. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून यातून लोकांना तीन महिने रोजगार मिळतो.
- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

Web Title: Millions of idols turn up in sales of millions of idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.