मुंबईत मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी लाखोंची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:38+5:302020-12-24T04:07:38+5:30

रॅकेटचा पर्दाफाश, सायन मेडिकल कॉलेजचा उप अधिष्ठाताही जाळ्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालय, केईएम रुग्णालयासह नामांकित ...

Millions looted for admission to medical college in Mumbai | मुंबईत मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी लाखोंची लूट

मुंबईत मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी लाखोंची लूट

Next

रॅकेटचा पर्दाफाश, सायन मेडिकल कॉलेजचा उप अधिष्ठाताही जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालय, केईएम रुग्णालयासह नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सायन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायन मेडिकल कॉलेजचे उप अधिष्ठाता राकेश रामनारायण वर्माला (५४) सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त बी.एस इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड मध्य प्रदेशच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर अलिशा अब्दुल्ला शेख यांना वर्माने सायन रुग्णालय मेडिकल कॉलेज येथे एमडीचे शिक्षण घेण्याकरिता ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनीही विश्वास ठेवून ५० लाख रुपये वर्माला दिले. मात्र, पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने शेख यांनी सायन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. तपासात वर्मा यांच्या कॉर्पोरेशन बँक खात्यावर शेख यांच्या वडिलांनी २१ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बुधवारी नायर रुग्णालयाच्या डॉक्टर वसाहतीतून वर्माला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शेख यांच्याकडून ५० लाख घेतल्याचे स्पष्ट होताच, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्याची फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत. तपास अधिकारी घुगे, निकिता नारणे, जाधव, गायकर यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Millions looted for admission to medical college in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.