Join us

लाखोंची रेती जप्त

By admin | Published: June 30, 2015 10:52 PM

तालुक्यातील वैतरणा कोपर, खातिवडे रेतीबंदरावर महसूल विभागाची पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत रेती साठविण्यासाठी बांधलेल्या कुंड्या

वसई : तालुक्यातील वैतरणा कोपर, खातिवडे रेतीबंदरावर महसूल विभागाची पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत रेती साठविण्यासाठी बांधलेल्या कुंड्या तसेच रेती काढण्यासाठी वापरले जाणारे सेक्शन पंपही तोडण्यात आले. या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.मंगळवारी सकाळपासूनच महसूल अधिकारी व पोलीस यांचा फौजफाटा घेऊन या बंदरावर कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला मजूर राहत असलेल्या झोपड्या तोडून रेतीच्या कुंड्या उध्वस्त केल्या. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने रेती काढणाऱ्या सक्सन मशीन तोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे लाखो रुपयांचा अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई चालू असल्यामुळे किती मुद्देमाल जप्त करण्यात आला हे कारवाई पूर्ण झाल्यानंतर समजेल असे नायब तहसिलदार गुरव यांनी सांगितले.या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वसई तालुक्यातील विरार, वालिव, नालासोपारा, तुळींज, माणिकपूर, अर्नाळा, वसई या पोलीस स्टेशनचे १०० पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले होते. या कारवाईत रेती काढण्याची यंत्रे, बोटी तोडून नष्ट केल्या. पण या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याने ही कारवाई पूर्व नियोजित होती होती का? अशी शंका नागरीकांत व्यक्त होत आहे. (वार्ताहर)