दादर चौपाटीवरून जमा केला लाखो टन कचरा; पावणेतीन वर्षांपासून सुरू आहे सफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:36 AM2019-10-28T01:36:39+5:302019-10-28T06:14:45+5:30

मुंबईकरांचा सहभाग, तरीही कचरा कमी होत नसल्याची खंत

Millions of tonnes of waste collected from Dadar Chowpatty; Cleanliness has been underway for the past three years | दादर चौपाटीवरून जमा केला लाखो टन कचरा; पावणेतीन वर्षांपासून सुरू आहे सफाई

दादर चौपाटीवरून जमा केला लाखो टन कचरा; पावणेतीन वर्षांपासून सुरू आहे सफाई

Next

सागर नेवरेकर 

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे प्रदूषित झाले असून काही स्वच्छतादूतांकडून समुद्रकिनाऱ्यावर दर शनिवार आणि रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. दादर चौपाटीवर गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्वच्छता मोहीम राबविली जात असून आतापर्यंत लाखो टन कचरा जमा करण्यात आला आहे. स्वच्छतादूत जय शृंगारपुरे हे १३५ आठवडे तर मल्हार कळंबे हे ११२ आठवडे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
करत आहेत़ तरीही समुद्रकिनाऱ्यांवरचा कचरा कमी होत नसल्याची खंत स्वच्छतादूतांनी व्यक्त केली आहे.

मनसेच्या पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे म्हणाले की, पावणेतीन वर्षांपासून दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवत आहे. आतापर्यंत १३५ आठवडे स्वच्छता मोहिमेला झाले आहेत. सुरुवातीला मी व माझ्या मुलीने दादर चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा केला. मुलीने बीच स्वच्छ करण्याचे प्रोत्साहन दिले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढत गेला. आता जय फाउंडेशनतर्फे स्वच्छता मोहिमेला एक वेगळे वळण मिळाले आहे़ शाळा, महाविद्यालय, संस्था व संघटनांचे स्वयंसेवक मोहिमेला जोडले गेले आहेत़ साधारण प्रत्येक महिन्याला ६०० ते ७०० नागरिक मोहिमेत सहभागी होतात. आतापर्यंत १६०० टन कचरा दादर चौपाटीवरून उचलण्यात आला आहे.

बीच प्लीज मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे म्हणाले की, दादर चौपाटी स्वच्छता मोहिमेला ११२ आठवडे झाले आहेत. या आठवड्यामध्ये सुमारे २० लाख किलो कचरा दादर चौपाटी आणि मिठी नदीतून जमा करण्यात आला आहे. स्वच्छता मोहिमेबरोबरच आता शाळा
व महाविद्यालयांत जाऊन स्वच्छतेबद्दल जनजागृती करत आहोत. नदी व समुद्रात जे प्लॅस्टिक सापडते त्याचे रिसायकलिंग करण्याचे काम
सुरू आहे. प्लॅस्टिक कचºयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक आढळून येते. त्यामुळे प्लॅस्टिकचे विभाजन करणे कठीण जाते. आता आपण कचरा गोळा करतो आणि तो डम्पिंगला जातो. पुन्हा तो कचरा नदीत किंवा समुद्रात येतो. त्यामुळे कचºयाचे रिसायकल होणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: Millions of tonnes of waste collected from Dadar Chowpatty; Cleanliness has been underway for the past three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.