मिनीबस दरीत कोसळली
By admin | Published: April 22, 2015 10:45 PM2015-04-22T22:45:15+5:302015-04-22T22:45:15+5:30
माथेरान येथे पर्यटकांना घेवून आलेल्या पनवेल येथील मिनीबसला घाटातून खाली उतरताना अपघात झाला. गार्बेट वळणावर ही गाडी साधारण ५
कर्जत : माथेरान येथे पर्यटकांना घेवून आलेल्या पनवेल येथील मिनीबसला घाटातून खाली उतरताना अपघात झाला. गार्बेट वळणावर ही गाडी साधारण ५0 फूट खोल दरीत गेली असून चालक जखमी झाला आहे. मिनीबसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. जखमी चालकाला नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
श्रीशिवकृपा टूर कंपनीची पनवेल चिपळे भागातील मिनीबस मंगळवारी दुपारी पनवेल येथून पर्यटकांना घेवून नेरळ मार्गे माथेरानला आली होती. पर्यटक प्रवाशांना सोडून ही गाडी पुन्हा पनवेल दस्तुरी नाका येथून निघाली होती. उत्तम वाघमारे हे चालक ट्रॅव्हलर गाडी घेवून घाटातून निघाले होते. गार्बेट वळणावर ही गाडी तेथे लोखंडी कठडे तोडून खाली दरीत कोसळली. ही माहिती नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी सचिन पाटील आणि अनिल सुर्वे यांना समजताच त्यांनी तातडीने तेथे आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेवून ५0 फूट दरीमध्ये गेलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचे चालक उत्तम वाघमारे यांना जखमी अवस्थेत गाडीतून बाहेर काढून टॅक्सीने नेरळ येथील डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात आणले व टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पनवेल येथे संपर्क साधून जखमी चालकाच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली. जखमी चालक उत्तम वाघमारे यांच्या डोक्याला मार लागला असल्याने नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)