Join us

...तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; शेतकऱ्याच्या धक्काबुक्कीवर बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 3:40 PM

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एक शेतकरी त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर आला होता.

मुंबई: बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एक शेतकरी त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर आला होता. मात्र मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी  शेतकऱ्याला अडवून शेतकऱ्याला धक्काबुक्की केली होती.  या सर्व प्रकरणावर सामान्य नागरिक, शेतकरी यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतलीच पाहिजे. तसेच आज प्रशासनाकडून जी चूक झाली आहे ती सुधारणे आवश्यक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जर असा काळ पुन्हा आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला. 

 शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. देशमुख असं शेतकऱ्यांचे नाव असून ते पनवेलहून भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत आठ वर्षाची मुलगीही होती. मात्र सकाळपासून मातोश्रीबाहेर उभं राहिल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांसोबत भेट न झाल्याने शेतकऱ्याने पोलिसांना मातोश्रीमध्ये जाऊ देण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी शेतकऱ्याची अडवणूक केली होती. यानंतर शेतकरी व त्यांच्या मुलीला खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. 

टॅग्स :बच्चू कडूउद्धव ठाकरेशेतकरीमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी