Join us

धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:25 PM

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला घरचा आहेर..

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : मुंबई-  मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. यावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे भुजबळ यांनी 'धक्के मारुन आम्हाला बाहेर काढले, असा आरोप 'लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

'मराठा समाजाल वेगळ आरक्षण द्या ही माझीही मागणी आहे. पण आता कुणबी नोंदी सापडल्या या नावाखाली सर्व मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या असं सुरु आहे. सरकार आधी वेगळ आरक्षण आम्ही देणार म्हणत होतं. तर आता मराठा समाज अप्रगत आहे हे सिद्ध करणारा अहवाल तयार करत आहे, तर मग मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याचे कारण काय, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. 

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

'एका बाजूला ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याचे काम सुरू आहे, असं सांगतात  तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन मी शपथ पूर्ण केली आहे. ओबीसींना धक्का लागणार नाही अस म्हणता तर मग मुख्यमंत्र्यांनी परवा जे सांगितलं त्याचा अर्थ काय? असंही भुजबळ म्हणाले. एका आरक्षणात आणखी दहाजण आले तर मुळ व्यक्तींना मिळणार नाही. म्हणजे ओबीसी, गोरगरीब आहे तो संपणार आहे. धक्का लागला नाही म्हणता पण तुम्ही तर आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. 

आम्हाला कोणालाच न विचारता हे केलं 

छगन भुजबळ म्हणाले, एकदा फक्त मुख्यमंत्री म्हणाले होते,  त्यांच असं म्हणणं आहे की, निजामशाहीत काही कागदपत्रे आहेत त्यामध्ये आमच्या नोंदी आहे. मग आम्ही करा म्हणून सांगितलं. म्हणून त्यांनी समिती नेमली पण पुढ हे वाढतच गेले, आता सगळ्या सगे सोयऱ्यांना द्या इथंपर्यंत त्यांची मागणी आली. यात शंभर रुपयांचे शपथ पत्रही नाही. आम्हाला कोणालाच न विचारता हे केलं आहे, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.   

ओबीसी आरक्षण संपल तर पाच पिढ्या मिळणार नाही

"मी या आधी शिवसेनेत काम करत होतो. पहिल्या दोन-तीन नेत्यांच्यामध्ये माझ नाव होते. तेव्हा मी ओबीसी प्रश्नावर मी जीव धोक्यात घालून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. मंत्रिपद येतात, जातात. अनेकवेळा आली गेली, पण हे ओबीसी आरक्षण संपले की पाच पिढ्या सुद्धा मिळणार नाही. मी ओबीसी आरक्षणाबाबत जे खर आहे तेच मी बोलत आहे. ओबीसी नेते जे माझ्यासोबत येतील ते येतील, असंही भुजबळ म्हणाले.  

 

टॅग्स :छगन भुजबळओबीसी आरक्षणमराठा आरक्षणछगन भुजबळ