'सुशांतसिंग प्रकरणाचा तपास CBI कडे गेला ते बरं झालं'; ठाकरे सरकामधील 'या' मंत्र्याचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:09 PM2020-08-24T20:09:36+5:302020-08-24T20:12:36+5:30
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानं बरं झालं असं मत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई: सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपा नेत्यांकडून न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका करण्यात आली होती. याचदरम्यान सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानं बरं झालं असं मत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलं असतं तरीही आरोप करण्यात आले असते. त्यामुळे आता असं वाटतं की सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे गेलं ते बरं झालं. तसेच आता लवकरच सत्य बाहेर येईल, असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
इतर राज्याप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण
तत्पूर्वी, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सतत रिया चक्रवर्तीवर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच तपास जसजसा पुढे जात आहे, तसं नवनवीन गोष्टी समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत सुशांतची अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबईपोलिसांनी त्यांना लवकरच पोस्टमार्टम करण्यास सांगितले होते. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, जेव्हा सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांची सुशांतची अॅटॉप्सी करण्यात इतकी घाई का केली आहे असे विचारले तेव्हा एका डॉक्टरने सांगितले की, त्यांना मुंबई पोलिसांना तसे करण्यास सांगितले आहे. 14 जून रोजी सकाळी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंखावर लटकलेला आढळला, त्यानंतर 14 जूनच्या रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टेम करण्यात आला.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सुप्रीम कोर्टाने (19 ऑगस्ट) हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या-
'...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला
'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी
काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...