एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 07:08 PM2022-10-02T19:08:15+5:302022-10-02T20:04:41+5:30

एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. 

Minister Deepak Kesarkar has advised that CM Eknath Shinde should take precautions regarding security. | एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला

एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. या अनुषंगाने पोलिस आता तपास करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. 

'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

दीपक केसरकरांनी आज सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीच्या फोनवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. पालकमंत्री असताना, नक्षलवादी विरोधात कारवाई केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे आम्ही नेहमी त्यांना सुरक्षेचे बॅरियर सोडून गर्दीत जाऊ नका, असं सांगतो. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय आहेत. मात्र सुरक्षेबाबत त्यांनी योग्य की खबरदारी घ्यावी. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपण दोन पंतप्रधानांना गमावलो आहोत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

सदर प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धमकीचे मला अनेकदा फोन आले. माझ्यावर अशा धमकींचा परिणाम होत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच पोलीस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, गेल्या महिन्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवरहोणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील, अशी माहिती मिळत आहे.

Web Title: Minister Deepak Kesarkar has advised that CM Eknath Shinde should take precautions regarding security.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.