सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या; मंत्री मुंडे यांची मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 06:39 IST2024-12-27T06:38:44+5:302024-12-27T06:39:44+5:30
वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे

सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या; मंत्री मुंडे यांची मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी
मुंबई : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांच्या हत्येच्या सूत्रधारांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून तपास तातडीने पूर्ण करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की देशमुख हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आरोपीचे, तो कुणाच्याही जवळचा असला तरी समर्थन केले जाऊ शकत नाही. मला मंत्रिपद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले, असेही ते म्हणाले. याचा संबंध ज्यांच्याशी जोडला जात आहे ते वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे आहेत, असा दावाही मुंडे यांनी केला.