'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

By मुकेश चव्हाण | Published: February 3, 2021 08:07 PM2021-02-03T20:07:06+5:302021-02-03T20:58:45+5:30

काही मराठी वृत्ताहिनीच्या वृत्तानूसार, करुणा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

Minister Dhananjay Munde gave an explanation after his second wife's allegation | 'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई: कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे (शर्मा) यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. 

काही मराठी वृत्ताहिनीच्या वृत्तानूसार, करुणा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे या आरोपाबाबत म्हणाले की, करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत  उच्य न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्य न्यायालयाने, मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादांसह इतर सर्व सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

तसेच जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे करुणा शर्मा याना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणारच आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

करुणा मुंडेंनी नेमके काय आरोप केले आहे-

करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्ताकडे दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले.  चित्रकूट बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात.

माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे  चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही करुणा मुंडे यांनी केली आहे. 


आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे  राजनीति की पावर का दूर उपयोग
इतना अत्याचार तो रावण ने भी नहि किया होगा

Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, 1 February 2021

Web Title: Minister Dhananjay Munde gave an explanation after his second wife's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.