मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:11 PM2021-10-26T15:11:07+5:302021-10-26T15:12:11+5:30
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देताना आपलं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही
मुंबई - सोशल मीडिया अकाऊंट हँक होणं हा नवीन प्रकार राहिला नाही, पण चक्क मंत्रीमहोदयांचं फेसबुक पेजच हॅक करण्यात आलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियातील या हॅकर्संना आळा घालण्यासाठी आता सायबर विभागाने मोहीम आखणे गरजेचं असल्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आल होते. त्यानंतर, आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच फेसबुक पेज हॅक करण्यात आलंय.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देताना आपलं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही. तरी, फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देऊन पेज सुरू करावे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाकडे आपण रीतसर तक्रारही नोंदवल्याचे त्यांनी सांगितलंय.
Dear @Facebook team, I have lost my admin and moderator access to my Facebook Page 'Dhananjay Munde (@DPMunde)' The page link : https://t.co/AtPLWzKJHx
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2021
Seems it's a hack on my page!
Request to quickly retrieve our admin/moderator access. Thank you. @FacebookIndia@MahaCyber1pic.twitter.com/3YYFvJUSJi
दरम्यान, सोशल मीडियावर फेक लिंक शेअर करुन, फेक अकाऊंट काढून, अकाऊंट हॅक करुन आणि फेक कॉलद्वारे नागरिकांना फसविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. विशेष म्हणजे या फसवणुकीचा सामना बड्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांनाही करावा लागतो. काही दिवसांपूर्वी एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला फोन कॉलद्वारे फसविण्यात आले होते. तर, एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैशांची मागणी होत होती. त्यानंतर, आता मंत्री धनंजय मुंडे यांचही फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं उघड झालं आहे.