"ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:44 AM2021-03-24T10:44:02+5:302021-03-24T10:44:42+5:30

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

Minister Jitendra Awhad has criticized BJP leader Kirit Somaiya. | "ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय"

"ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय"

Next

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ६०० कोटींचा  SRA घोटाळा केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ईडीचा प्रतिबंध असताना देखील २ मार्च रोजी ३.३० वाजता SRAने आदेश काढून दुसऱ्या विकासकाला हा प्रकल्प दिला, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या ६०० कोटींच्या घोटाळ्यामागे कोण आहे आहे, मंत्री जितेंद्र आव्हाड की मंत्री अनिल परब?, असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. 

किरीट सोमय्या यांच्या या आरोपाला ठाकरे सरकारने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्वप्नात हजारो लाखो कोटींचा भ्रष्टाचार बघणाऱ्यांनी SRAमध्ये स्वप्नात ६०० कोटींचा भ्रष्टाचार बघितला आहे. हिंमत असेल तर, भ्रष्टाचाराचा रुपयाचा तरी पुरावा द्या. ज्याच्यासाठी आपण आरोप केला आहे. त्या क्षणाला माझा राजीनामा पाठवून देईन. उगाच येड्यावानी गावभर बोंबलत फिरू नका, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहे, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. 

दरम्यान,  दिवान हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या कंपनीचा हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. डीएचएफएलचे मालक कपिल वाधवान यांनी एका बोगस कंपनीद्वारा ६०० कोटी रुपये गुरुनानक कन्स्ट्रकशनद्वारा या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात गुंतवले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) या प्रकल्पावर जप्ती आणली, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला कळविले जोपर्यंत डीएचएफएलचे ६०० कोटी रुपये गुरुनानक कन्स्ट्रकशन किंवा अन्य कोणत्याही विकासक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण परत देत नाही. तोपर्यंत हा प्रकल्प कोणालाही हस्तांतरित करू नये अशा प्रकारची ही नोटीस दिली. अशा प्रकाराने सुमारे अर्धा डझन प्रकल्पात कपिल वाधवान यांनी अपारदर्शकरित्या बोगस कंपन्यांनद्वारा दिवान हौसिंग फायनान्स लिमिटेडचे शेकडो कोटी रुपये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात वळविले आहेत. या सगळ्या प्रकल्पांवर बंदी आहे, असं किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटलं.

ईडीच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यानंतर ईडीने स्पष्टरित्या जोपर्यंत ६०० कोटी रुपये डीएचएफएलचे परत दिले जात नाही तोपर्यंत कुणालाही हा प्रकल्प हस्तांतरित करू नये अशी ताकिदही केली होती. झोपडपट्टी पुनर्वसन झाले पाहिजे परंतु, घोटाळ्याचे ६०० कोटी रुपये परत द्यायला हवे.हा प्रकल्प वळविण्याचा आदेश कोणी दिला होता? झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी? गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड? मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष मंत्री अनिल परब? याचा तपास करण्याची मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.

Web Title: Minister Jitendra Awhad has criticized BJP leader Kirit Somaiya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.