Join us

आरेतील दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाटन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 27, 2024 5:08 PM

पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज सकाळी दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

मनोहर कुंभेजकर, मुंबई:मुंबई उपनगर जिल्हा व सांस्कृतिक विभाग,मुंबई यांच्या वतीने गोरेगाव ( पूर्व) आरे डेअरी,आदर्श नगर येथे दोन दिवसीय आदिवासी शबरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगराचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज सकाळी दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनी आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादरीकरणामध्ये स्वतः सहभाग घेतला.

येथील दालनात भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या आदिवासी स्वातंत्र्य योद्धांचा, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश,विविध आदिवासी योजनांची माहिती यांचे सादरीकरण करण्यात आले आहे.मंत्री लोढा यांनी या दालनाला सुद्धा भेट दिली.

सदर दोन दिवसीय शबरी महोत्सवात वैदू संमेलन, महिला संमेलन,आदिवासी नृत्यांचा आविष्कार तसेच आदिवासी पूजा पद्धती,  औषधी अशा विविध विषयांचा समावेश आहे.

यावेळी सामाजिक  कार्यकर्त्या नलिनी बुजड, सामाजिक  कार्यकर्त्या,  माजी नगरसेविका प्रीती सातम, माजी नगरसेविका, आदिवासी प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण, मॅगसेसे अवॉर्ड विजेते चैतराम पवार, बोरिवली तालुक्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार, अभ्यासक व प्राध्यापक शरद शेळके, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पंकज पाठक आदी मान्यवर उपस्थित राहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश पाडवी यांनी केले.

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढाआरे