"...तर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार; भाजपाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार"

By मुकेश चव्हाण | Published: December 21, 2020 07:28 PM2020-12-21T19:28:43+5:302020-12-21T19:35:13+5:30

सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Minister Nawab Malik said that NCP President Sharad Pawar would go to West Bengal if needed | "...तर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार; भाजपाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार"

"...तर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार; भाजपाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार"

Next

मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण ताकद, यंत्रणा पणाला लावली जात आहे. तर भाजपाच्या काही चेहऱ्यांनी या निवडणुकीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेत आहेत. भाजपा केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. 

नवाब मलिक म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम करीत आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली. तसेच गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्येही जातील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम गालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ मे २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. 

Web Title: Minister Nawab Malik said that NCP President Sharad Pawar would go to West Bengal if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.