महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित कामांची जंत्री

By admin | Published: November 22, 2014 10:48 PM2014-11-22T22:48:46+5:302014-11-22T22:48:46+5:30

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची 136 वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.

Minister of the pending work to the Mayor's Chief Minister | महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित कामांची जंत्री

महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित कामांची जंत्री

Next
वसई :  मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची 136 वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या वेळी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्राधिकरणावरील सदस्य महापौर नारायण मानकर यांनी वसई-विरार उपप्रदेशातील अनेक प्रलंबित विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. ही प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावावी तसेच उपप्रदेशाच्या विकासासाठी भरीव आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी केली.
प्राधिकरणाच्या सभेत झालेल्या चर्चेदरम्यान महापौर मानकर यांनी दिवाणमान व आचोळे येथील मीठ कंपन्यांना देण्यात आलेल्या भाडे करारावरील जमिनीसंदर्भात मुदतवाढ देऊ नये, मौजे दिवाणमान येथील जमीन पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, नगर परिषद कार्यालय, वाहनतळ, सार्वजनिक इस्पितळ व क्रीडा संकुल  या विकासकामांकरिता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणो तसेच या जमिनीवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर आर्थिक विकास केंद्रे उभारणो, मनपा हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालय मनपाकडे सोपवणो, राष्ट्रीय महामार्गावर 2क्क् खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल बांधणो, वसई-विरार शहराला पूर्व-पश्चिम जोडणारे 5 उड्डाणपूल बांधून देणो, नायगाव-भाईंदर खाडीवरील पूल बांधण्यासाठी 1क्क् कोटींची तरतूद करणो, सूर्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत उर्वरित शासकीय अनुदान त्वरित उपलब्ध करणो, कोपर येथील सरकारी पडजमीन पाणीपुरवठा उपांगासाठी महानगरपालिकेकडे सोपवणो, मेट्रो सुधारित मार्ग-2 समवेत भुयारी  मेट्रो मार्ग थेट वसई-विरार शहराला जोडणो इ. महत्त्वाच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले व तत्संबंधीचे निवेदन त्यांना सादर केले. 

 

Web Title: Minister of the pending work to the Mayor's Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.