मंत्रिपदे 'स्ट्राइक रेट'वर की, आमदारांच्या संख्येवर? शिंदेसेनेएवढीच आम्हाला मंत्रिपदे हवीत, अजित पवार गट सरसावला
By दीपक भातुसे | Published: December 4, 2024 09:28 AM2024-12-04T09:28:00+5:302024-12-04T09:29:31+5:30
महायुती सरकारमध्ये भाजपाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त असून, त्याखालोखाल शिंदेसेना आणि अजित पवार गट क्रमांक तीनवर आहे.
दीपक भातुसे
मुंबई : महायुती सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत स्पष्टता नसतानाच आता मंत्रिपदासाठी विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या 'स्ट्राइक रेट'चा आधार घेण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे.
महायुती सरकारमध्ये भाजपाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त असून, त्याखालोखाल शिंदेसेना आणि अजित पवार गट क्रमांक तीनवर आहे. मात्र, शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये जास्त फरक नाही. त्यामुळे शिंदेसेनेला जेवढी मंत्रिपदे मिळतील, तेवढीच मंत्रिपदे अजित पवार गटाला हवी आहेत. मात्र, 'स्ट्राइक रेट' नुसार नव्हे, तर आमदारांच्या संख्येनुसार मंत्रिपदांची संख्या आणि खात्यांचे वाटप होईल, अशी भूमिका शिंदेसेनेने मांडली आहे.
स्ट्राइक रेटनुसार भाजप एक क्रमांकावर, तर आमचा पक्ष आणि शिंदेसेनेच्या स्ट्राइकरेटमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे आम्हालाही शिंदेंसेनेएवढी मंत्रिपदे मिळायला हवीत, अशी मागणी शिंदेसेनेला मिळतील तेवढी मंत्रिपदे आम्हालाही मिळायला हवीत, असे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले. अजित पवार यांच्याबरोबर आमची एक बैठक झाली. त्यात आम्ही हिशेब केला. शिंदेसेनेने जास्त जागा लढवल्या, त्यामुळे त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या.
कदाचित शिंदेसेना आणि आमच्या पक्षाला समान मंत्रिपदे मिळतील किंवा एऱादी जागा कमी जास्त होईल,असंही भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ यांच्या या विधानाचा शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. आता कसा 'स्ट्राइक रेट' आठवला? लोकसभेच्या 'स्ट्राइक रेट'वर का बोलले नाही?, शपथविधी तोंडावर असताना अशी विधाने करून नेमके काय मिळवायचे आहे?, आमदार कोणाचे जास्त निवडून आले त्याला लोकशाहीत महत्त्व आहे. त्यावरूनच मंत्रिपदाची संख्या आणि खात्यांचे वाटप होईल, अशी ठाम भमिकाद्री शिरसाट यांनी मांडली. एकूणच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्णय होण्याआधीच महायुतीत संघर्ष?
शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या स्ट्राइक रेटमध्ये केवळ ०.८८ टक्क्यांचा फरक आहे.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहिती- नुसार महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संख्या आणि खाती ही 'स्ट्राइक रेट'वर नव्हे, तर आमदारांच्या संख्येवर ठरणार आहेत.
■ त्यामुळे त्याला अजित पवार गटा- कडूनही फारसा विरोध होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
असे पक्ष... असा स्ट्राइक रेट
भाजप १४९ १३२ ८८.५९ टक्के
शिंदेसेना ८७ ५७ ७०.३७ टक्के
अजित पवार गट ५९ ४१ ६९.४९ टक्के