रेल्वे राज्यमंत्री तीन दिवस महाराष्ट्रात
By admin | Published: June 25, 2014 01:03 AM2014-06-25T01:03:47+5:302014-06-25T01:03:47+5:30
मुंबई महाराष्ट्रातील रेल्वेचे रूतलेले चाक रूळावर आणण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या विशेष दौ:यावर येणार आहेत.
Next
>नवी दिल्ली : मुंबई महाराष्ट्रातील रेल्वेचे रूतलेले चाक रूळावर आणण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या विशेष दौ:यावर येणार आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर त्यांचा हा दौरा राहील. मुंबई, ठाणो, कल्याण, औरंगाबाद, मनमाड, नागपूर, अमरावती, नांदेड, भुसावळ या स्थानकांची पाहणी करून, तेथील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिका:यांशी चर्चा तात्काळ निर्णय घेतले जाणार आहेत. आम्ही पोस्टमनचे काम करतोय, रेल्वे प्रवाशांच्या भावना मांडतो, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
मंगळवारी रेल भवनात महायुतीच्या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान हा प्रकल्प विकास दौरा ठरला, असे सांगून तावडे म्हणाले, ‘राज्यातील अनेक प्रश्न रखडले आहेत. काही प्रकल्प दहा वर्षे झाले तरी काही सुरू झाले नाहीत. फळ व फुलांच्या वाहतुकीसाठी गरजेचा असलेला कल्याण-माळशेज- अहमदनगर हा रेल्वेमार्ग रखडला. मुंबईतील ठाणो-कल्याण टर्मिनल्स, अंधेरी-बोरीवली हार्बर मार्गाचे विस्तारीकरण, रल्वे प्लॅटफार्मची उंची वाढविणो, मुंबईतील सर्वच मोठय़ा लोकल रेल्वे स्थानकावर 24 तास रुग्णवाहिका आदी विषय यातून पूर्ण होतील. (विशेष प्रतिनिधी)
काय म्हणाले तावडे?
च्काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मातब्बर नेते भाजपाच्या संपर्कात असून, आम्ही फिल्टर लावून त्यांचा प्रवेश देऊ. ज्यांना लोकांमध्ये वाव नाही त्यांना नाकारू.
च्विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे ते जातीय व धार्मिक आरक्षणाचे मुद्दे पुढे करत आाहेत.
च्जुलैच्या मध्यास उमेदवार ठरविण्यासाठी ‘महायुतीची’ पहिली बैठक
च्2क्क् पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात महायुतीच्या असतील.
च्कोणा एका पक्षाचा मुख्यमंत्री नसेल, तर महायुती ठरवेल तोच होईल.
च्गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग विधानसभेत राबविणार.
च्चितळे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार दोषी आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
च्ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठी समाजातील मागास व्यक्तीला आरक्षण मिळाले पाहिजे.