दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:20+5:302021-07-25T04:06:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन येथे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ...

Minister for Traffic Management in South Mumbai Aditya Thackeray inspected | दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन येथे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत होण्याच्या दृष्टीने नरिमन पॉइंट-कफ परेड जोड रस्ता प्रस्तावित आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी त्याची पाहणी केली.

मुंबईत वाहनांची वाढणारी संख्या आणि विविध ठिकाणी होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन रस्ते वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. मंत्री ठाकरे त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

दक्षिण मुंबईतील कफ परेड, कुलाबा परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता सध्या नरिमन पॉइंट तसेच मंत्रालय परिसरात वाहतूककोंडी निर्माण होते. याबाबत उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत नरिमन पॉइंट-कफ परेड जोडरस्ता प्रस्तावित आहे. या जोड रस्त्यासाठी विविध पर्यायी जागांची ठाकरे यांनी नरिमन पॉइंट, बधवार पार्क, मच्छीमार सोसायटी, कफ परेड, कुलाबा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. या वेळी त्यांच्यासमवेत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.

(फोटो आहे)

Web Title: Minister for Traffic Management in South Mumbai Aditya Thackeray inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.