Join us  

बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:30 AM

जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुंबई- जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.  गेल्या २० वर्षापासून आमदार बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. बच्चू कडू म्हणाले, मोठ्या संघर्षानंतर आता देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय सुरू झाले आहे. पण, ते दिव्यांग बांधवापर्यंत गेलं पाहिजे. ही संकल्पना आमचीच होती. त्या बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. 

"आता हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत. फक्त सेवेसाठी हे अभियान असणार आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही काम करणार आहोत, मला ही संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली. यासाठी मी त्यांच आभार मानतो, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसापूर्वी मंत्रिपदासंदर्भात माध्यमांसमोर बालूनहू दाखवले होते. अखेर त्यांना आता मंत्रिपद देण्यात आले आहे.

टॅग्स :बच्चू कडूएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस