मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सोमवारी बैठक पार पडली. मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जुनेच रडगाणे सुरू असल्याची माहिती समोर आली. महामंडळाने उच्च स्तरीय समितीच्या अहवालाचा दाखला देत, ७४१ कोटींचा प्रस्ताव संघटनेसमोर ठेवला. हा प्रस्ताव संघटनेने नाकारला आहे.महाराष्ट्र एसटी कामगार संघटना (मान्यता प्राप्त) आपल्या प्रस्तावावर ठाम आहे. यामुळे सोमवारी झालेली बैठकही यापूर्वीच्या बैठकीप्रमाणे निष्फळ ठरली. उच्चस्तरीय समितीची वाढ ही असमाधान कारक असल्याने संघटनेने प्रस्ताव फेटाळला. परिणामी, मंगळवारी दुपारी ४ वाजता पुन्हा बैठक आयोजित केली असल्याची माहिती कामगार संघटनेने दिली.
वेतन कराराच्या बैठकीत मंत्र्यांचे ‘जुनेच रडगाणे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:48 AM