मंत्रालयात शुकशुकाट; कोरोनामुळे मंत्र्यांचेही वर्क फ्रॉम होम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:52 AM2020-04-03T00:52:57+5:302020-04-03T00:53:14+5:30
बहुतेक मंत्री गृह जिल्ह्यात कार्यरत, युद्धपातळीवर काम सुरू
मुंबई : महाविकास आघाडी सरकार आल्यापासून मंत्रालयातील गर्दी प्रचंड वाढली असे चित्र असताना गेले काही दिवस मात्र कोरोनाच्या सावटाखाली मंत्रालयात शुकशुकाट दिसत आहे. बहुतेक मंत्र्यांनी वर्क फ्रॉम होम करणे पसंत केले आहे.
लॉक डाऊनच्या काळात केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर आहेत, त्याचा परिणाम मंत्रालयात दिसत आहे. अत्यंत आवश्यक कामांसाठीच कर्मचारी, अधिकाऱ्यांना बोलविले जाते. इयर एण्डिंगच्या कामामुळे ३१ मार्चपर्यंत बºयापैकी उपस्थिती काही विभागांमध्ये होती. मात्र बुधवारी ती आणखी कमी झाली. गेले बारा दिवस मंत्री अभावानेच मंत्रालयात येत आहेत. दररोज दोन-तीन मंत्री मंत्रालयात थोडावेळ येऊन जातात.
आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात महत्त्वाची भूमिका आहे. हे दोघेही मुंबईत आहेत. दोघेही ज्या पद्धतीने झोकून देऊन काम करत आहेत, त्याचे कौतुक होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हेही मुंबईत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळांमध्ये केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देतात.
मुंबईकर मंत्री अर्थातच मुंबईत आहेत पण ते कोरोना संदर्भात प्रशासनाशी समन्वय राखून आहेत. कोरोनासंदर्भात उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी बहुतेक मंत्री आपापल्या जिल्ह्यात फिरत आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. याशिवाय आपल्या विभागाच्या संदर्भात संबंधित कामे ते घरूनच करीत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक नाही
च्विधिमंडळाचे अधिवेशन १४ मार्चला संपले तेव्हापासून राज्य मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.च्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मंत्रिमंडळाची एखादी बैठक व्हायला हवी म्हणजे कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात अधिक परिणामकारक उपाययोजना आणि समन्वय राखता येईल, अशी अधिकाºयांची भावना आहे.