अल्पवयीन मुलाला विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:21 AM2018-07-19T02:21:32+5:302018-07-19T02:21:45+5:30
अल्पवयीन मुलाचे विवस्त्र फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत लुबाडणूक करणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांवर समतानगर पोलिसांनी कारवाई केली.
मुंबई : अल्पवयीन मुलाचे विवस्त्र फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत लुबाडणूक करणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांवर समतानगर पोलिसांनी कारवाई केली. पैसे उकळण्याचा प्रकार मंगळवारी कांदिवलीमध्ये उघडकीस आला. त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
समतानगर परिसरात राहणाºया एका युवकाला त्याच्या मित्राने बोरीवलीला जेवायला बोलावले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली. त्याला विवस्त्र होण्यास सांगून त्याचे फोटो आणि व्हिडीओ बनविले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैशांची मागणी सुरू केली. अखेर पीडित मुलाने वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत चौघा जणांवर गुन्हा दाखल केला.