अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By Admin | Published: April 15, 2017 01:54 AM2017-04-15T01:54:15+5:302017-04-15T01:54:15+5:30

भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मागील आठ महिन्यांपासून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार

Minor girl child abuse | अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

googlenewsNext

मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मागील आठ महिन्यांपासून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. चौघा आरोपींना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह राहते. तीन वर्षांपासून परिसरातच राहणाऱ्या २० वर्षांच्या तरुणाशी तिची ओळख होती. आठ महिन्यांपूर्वी या तरुणाने तिला रात्रीच्या वेळी काम असल्याचे सांगून सरस्वतीनगर परिसरात नेले. तिथे तिच्या आई, वडील, भावंडांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. दोन-चार दिवसांनी त्या आरोपीने तिला पुन्हा दमदाटी करून त्याच परिसरात बळजबरी केली. त्यानंतर, त्याने अन्य तीन मित्रांनाही बोलावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
१०-१५ दिवसांनी त्याच २०वर्षीय आरोपीने पुन्हा तिला बोलावून आपल्या अन्य तिघा मित्रांसह तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीसोबत केलेल्या अत्याचाराची चर्चा आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये झाल्याचे समजते. त्यातूनच पीडित मुलीच्या परिचयातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही जीवे मारण्याची धमकी देऊन पालिका स्वच्छतागृहात पाच ते सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केला.
मागील आठ महिन्यांपासून सातत्याने या आठ आरोपींच्या अत्याचाराने पीडित मुलीला महिनाभरापासून मासिक पाळी येत नसल्याने व उलट्या होत असल्याने ६ एप्रिलला तिच्या पालकांनी डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. मुलीच्या आईवडिलांनी विचारपूस केल्यावर अत्याचाराला वाचा फुटली. (प्रतिनिधी)

शोधासाठी दोन पथके
नवघर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे व त्यांच्या पथकाने पाच जणांना अटक केली. अन्य तीन आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.

Web Title: Minor girl child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.