Join us

ठाण्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By admin | Published: July 26, 2016 1:00 AM

प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक लग्नाला नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी विजय शंकर जाधव (२१, रा. माजीवडा, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी

ठाणे : प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक लग्नाला नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी विजय शंकर जाधव (२१, रा. माजीवडा, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी फलटण भागातून सोमवारी पहाटे २ वा. च्या सुमारास अटक केली. त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. माजीवडा, साईनाथनगर भागातील राजश्री कांबळे (१६) या मुलीच्या वयाचा आणि गरिबीचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यामागे प्रेमाचा लकडा लावला. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शनिवारी अचानक लग्नाला नकार दिला. यातूनच तिने रविवारी दुपारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी त्याच्या अटकेसाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन कापूरबावडी पोलिसांनी फलटण येथून विजयची धरपकड केली. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले किंवा कसे? याबाबतचा वैद्यकीय अहवाल मिळण्याची मागणी जिल्हा रुग्णालयाकडे केली आहे. (प्रतिनिधी)अखेर अंत्यसंस्कार झाले... आरोपीला अटक केली तरच मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ.. अटकेनंतरच तिच्यावर अंत्यसंस्कार करु... असा पवित्रा मुलीच्या नातेवाईकांनी रविवारी घेतला होता. सोमवारी पहाटेच आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाल्यामुळे दुपारी शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.