Join us  

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Published: November 12, 2015 12:31 AM

जोगेश्वरी परिसरात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या इसमाला आंबोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

मुंबई : जोगेश्वरी परिसरात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या इसमाला आंबोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.हिरालाल तिवारी (५२) असे अटक इसमाचे नाव आहे. तो जोगेश्वरीमध्ये राहतो. वाहन चालकाचे काम करणाऱ्या तिवारीने याच परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेला प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकी दिली. मुलीने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानुसार तिच्या पालकांनी आंबोली पोलीस ठाण्यात तिवारीविरोधात तक्रार दाखल केली. याची माहिती मिळताच तिवारी घटनास्थळाहून पसार झाला.‘आम्ही तिवारीचा पाठलाग करत त्याला अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,’ असे आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खडतरे यांनी सांगितले.