अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Published: April 8, 2015 03:33 AM2015-04-08T03:33:57+5:302015-04-08T03:33:57+5:30

घरात कोणी नसल्याची संधी साधत अ‍ॅण्टॉप हिल येथे एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Minor girl raped | अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next

मुंबई : घरात कोणी नसल्याची संधी साधत अ‍ॅण्टॉप हिल येथे एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
सायन कोळीवाडा परिसरात ही दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिच्याच शेजारी हेमराज नदुम (३३) हा आरोपी पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. दोन महिन्यांपूर्वी या आरोपीने त्याच्या घरात कोणी नसताना या मुलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार त्याने मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. मागच्या महिन्यात अचानक मुलीच्या पोटामध्ये दुखू लागले. तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. त्यानुसार त्यांनी तिला सायनच्या सोमय्या रुग्णालयात नेले. या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी तिला काही औषधे दिली. मात्र औषधे घेऊनसुद्धा आराम मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करण्याचे सांगितले. त्यानुसार सोनोग्राफी केली असता ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.
समाजात बेअब्रू होईल, या भीतीने त्यांनी ही बाब कोणाला सांगू नका, अशी विनंती डॉक्टरांना केली. मात्र डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलीकडे आणि आई-वडिलांकडे विचारपूस केली. मात्र आम्हाला तक्रार दाखल करायचीच नाही, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी परिसरात चौकशी केलीे.
आरोपीला ही माहिती मिळताच तो पसार झाला होता. सोमवारी त्याला वडाळा परिसरात येताच अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.