Join us

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गोरेगावात भाजीवाल्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:32 AM

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार बुधवारी गोरेगावमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार बुधवारी गोरेगावमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.विशाल जयस्वाल (३५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. १५ वर्षांची पीडित मुलगी सीमा (नावात बदल) राहात असलेल्याच परिसरात तो राहतो. गेल्या काही दिवसांपासून सीमाच्या पोटात दुखत होते. तेव्हा तिची आई तिला एकापालिका रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरने तपासल्यानंतर ती सात आठवड्यांची गरोदर असल्याचे त्यांना समजले. ही बाब त्यांनी तिच्या आईला सांगितली, तसेच पोलिसांनाही कळविली. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा तिने जयस्वालचे नाव घेतले.वर्षभरापूर्वी सीमाच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर, ती मोठा भाऊ आणि आईसोबत राहते. त्यांचा भाजीचा व्यवसाय आहे. जयस्वाल हा रोज भाजी देण्यासाठी त्यांच्या घरी यायचा. याच दरम्यान सीमाला एकटे गाठून त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले, तसेच याबाबत कुठेही वाच्यता न करण्याचे तिला बजावले. अखेर पोलिसांनी जयस्वालला पकडले.वडिलांनाही अटकजयस्वाल याला बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याच्या वडिलांनादेखील वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. वर्षभर कारागृहात तरुंगावास भोगल्यानंतर, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.