मुंबई - एका इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवत शेजारच्या मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार सोमवारी रात्री वर्सोवा परिसरात घडला. याप्रकरणी एकाला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या घटनेमुळे वर्सोवा परिसरात खळबळ उडाली आहे. वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी रशीद मोहंम्मद सोलकर (४2) याला अटक केली असून त्याच्यावर भ.द.वी. नुसार 376, 354 गुन्हा दाखल केला आहे. तर पॉस्कोच्या कलमाअंतर्गत 4 आणि 5 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रशीद मोहंम्मद सोलकर (४2) पिडित मुलगी राहत असलेल्या परिसरातच राहतो. चॉकलेटचे आमिष दाखवत त्याने पिडित मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही बाब तिच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 'आम्ही याप्रकरणी सोलकर त्याच्यावर बलात्कार आणि पॉस्को कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे' अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितले. या घटनेने वर्सोवा परिसरात संतापाचे वातावरण आहे.